G-20 New Delhi Summit 2023 : शिखर परिषदेच्या पहिल्या ‘वन अर्थ’ सत्रात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?; वाचा…

| Updated on: Sep 09, 2023 | 4:10 PM

PM Narendra Modi Tweet About G-20 New Delhi Summit 2023 : G-20 परिषदेच्या 'वन अर्थ' सत्रात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?; कोणत्या मुद्द्यांवर कुणी काय मतं मांडली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर सांगितलं... पाहा काय म्हणाले...

G-20 New Delhi Summit 2023 : शिखर परिषदेच्या पहिल्या वन अर्थ सत्रात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?; वाचा...
Follow us on

G-20 New Delhi Summit 2023 : आंतराष्ट्रीय राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज G-20 ची शिखर परिषद होत आहे. आपल्या देशात ही परिषद आयोजित आहे. राजधानी दिल्लीत जगभरातील महत्वाचे नेते आलेत. सकाळी साडे नऊ वाजता हे महत्वाचे परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या भारत मंडपमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली. एक-एक करून हे नेते भारत मंडपमध्ये आले. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नेत्यांचं स्वागत केलं. यानंतर साडे दहा वाजता पहिल्या वन अर्थ या चर्चा सत्राला सुरुवात झाली. या परिषदेतील पहिल्या सत्रात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? याची जागतिक वर्तुळासह भारतातील लोकांनाही उत्सुकता होती. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेतील मुद्दे कोणते होते याची माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत G-20 ची शिखर परिषदेसंदर्भात माहिती दिली आहे. नेमके कोणते मुद्दे चर्चिले गेले याची त्यांनी माहिती दिली आहे. मानव केंद्रीत विकासाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्व आहे. याच मुद्द्यावर आजच्या या परिषदेत चर्चा झाली. या परिषदेच्या पहिल्या सत्रात मानव केंद्रीत विकासाला चालना देण्यावर भर देण्यात आला, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे.

युद्धाने विश्वासाच्या व्याख्येचा अर्थ अधिक गडद झाला. आपण सगळ्यांनी मिळून ग्लोबल ट्रस्ट डेफिनेशनला एका दृढ विश्वासात परावर्तीत केलं. सध्याचा काळ हा सोबतीने चालण्याचा आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ हा विकासाचा मंत्राही पंतप्रधान मोदी यांनी सांगितला आहे.

भारताला या G-20 परिषदेचं अध्यक्षपद भूषवत असताना देशातील आणि बाहेरील लोकांच्या सोबतीचं प्रतिक बनलं. लोक G-20 शी जोडलेलं आहेत. आपल्या देशात G-20 हा लोकांचा उत्सव बनला आहे. 60 शहरात 200 हून जास्त बैठका पार पडल्या, असंही मोदी म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी या परिषदेसाठी प्रस्तावना मांडली. G-20 परिषदेच्या प्रस्तावने दरम्यान मोदी यांनी मोठी घोषणा केली. आफ्रिकन युनियन आता या G-20 आंतरराष्ट्रीय समूहाचा कायमस्वरूपी सदस्य बनणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेमध्ये बोलताना सांगितलं.