ऑनलाईन पेमेंटचा जगात गाजावाजा; पंतप्रधानांनी सांगितली भारतातील अव्वल दर्जाची गोष्ट…
भारताच्या विकासाच्या टप्प्यातील दोन टप्पे महत्वाचे आहे. ते म्हणजे तंत्रज्ञान आणि प्रतिभा असं नरेंद्र मोदींनी सांगितले.
हैदराबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज हैदराबाद येथे ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड जिओस्पेशियल इंटरनॅशनल काँग्रेस’चे (‘United Nations World Geospatial International Congress) उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जगाला कोणत्याही संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करायची झाली तर संस्थात्मक दृष्टीकोन महत्वाचा आहे. युनायटेड नेशन्ससारख्या जागतिक संस्थांच्या माध्यमातूनच समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत प्रत्येक गोष्ट पोहचवण्याचं काम करतात. नरेंद्र मोदी यांनी यूएन काँग्रेसचे मंगळवारी उद्घाटन केल्यानंतर त्यांनी बोलताना सांगितले की, केले, या पाच दिवसीय परिषदेत गेल्या काही वर्षांपासून देशांनी या क्षेत्रात केलेली प्रगती, घेतलेल्या निर्णयांची माहिती यामध्ये दाखवली जाणार आहे.
या परिषदेत 115 देशांतील 550 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
हे प्रतिनिधी एकात्मिक भूस्थानिक, माहिती व्यवस्थापन आणि त्यांच्या क्षमतांच्या विकास आणि बळकटीकरणाशी संबंधित असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, भारताच्या विकासाच्या टप्प्यातील दोन टप्पे महत्वाचे आहे. ते म्हणजे तंत्रज्ञान आणि प्रतिभा.
तंत्रज्ञान हे बदल आणि परिवर्तनासाठी खऱ्या बदलाचा तेच आधार आहे. डिजिटलायझेशनचा देशातील नागरिकांना कसा फायदा होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे पीएम स्वामीत्व योजना हे आहे.
भारताविषयी बोलताना ते म्हणाले की, भारत हे अनेक कलागुणांनी नटलेलं राष्ट्र आहे. कोरोना महामारीच्या संकट काळाचं सांगताना ते म्हणाले की, त्या काळात आपल्याला एक धडा मिळाला आहे. सर्वांना सोबत घेऊन जगाने एकत्र पुढं गेले पाहिजे.
कारण त्याकाळात जगातील अब्जावधी लोकांना उपचार, औषधं, आणि इतर वैद्यकीय उपकरणं, लस आणि इतर अनेक गोष्टींची गरज होती. त्यामुळे हातात हात घालून पुढं गेलं पाहिजे असंही त्यांनी सांगितले.
आपल्य देशातील बँकिंग सेवेविषयी बोलताना ते म्हणाले की, 45 कोटी लोकांना बँकिंग सेवा दिली गेली आहे. अंत्योदयाचे काम करण्यासाठी आणि रांगेत उभा असलेल्या शेवटच्या माणसांपर्यंत ती सेवा पोहचवण्यासाठी देश काम करत आहे.
देशातील 45 कोटी लोकांना बँकिंगची सेवा पुरविण्यात आली. ही लोकसंख्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. तसेच विमा सुविधा नसलेल्या 13.55 कोटी लोकांचा विमा उतरवण्यात आला असून ही लोकसंख्या फ्रान्सच्या लोकसंख्येइतकीच आहे.
तर 11 कोटी कुटुंबांना स्वच्छता सुविधा आणि 6 कोटींहून अधिक कुटुंबीयांना नळाचे पाण्याची सोय देण्यात येत आहे. या विकासात्मक गोष्टी करुनच भारताला आता पुढे घेऊन जायचे आहे असंही त्यांनी सांगितले.
भारतात आता डिजिटल पेमेंटचा इतका वापर केला जात आहे की, आपला देश आता जगात अव्वल झाला आहे. विविध भागातील छोटे मोठे विक्रेतेही डिजिटल पेमेंट स्वीकारतात.