पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथाच्या दर्शनाला, 10 क्विंटल फुलांनी सजलं भोले शंकराचं मंदिर, पाहा Video

PM Narendra Modi आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास केदारनाथ मंदिरात पोहोचून पूजा करतील. त्यानंतर ९ वाजता ते केदारनाथ रोपवे प्रकल्पाचे भूमीपूजन करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथाच्या दर्शनाला, 10 क्विंटल फुलांनी सजलं भोले शंकराचं मंदिर, पाहा Video
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 7:55 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज उत्तराखंड राज्यातील केदारनाथ (Kedarnath) आणि बद्रीनाथ (Badrinath) धामाच्या दर्शनाला जात आहेत. मोदींच्या दौऱ्यासाठी दोन्ही मंदिरांमध्ये जंगी तयारी करण्यात आली आहे. केदारनाथ मंदिर तर 10क्विंटल फुलांनी सजवण्यात आलंय. सकाळीच केदारनाथाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येथील विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मंदिराच्या परिसरात 200 मीटर पर्यंत बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.

केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य पुजारी गंगाधर लिंग म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे केदारनाथाची पूजा करतील. तसेच विश्वशांती आणि विश्व कल्याणासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गर्भगृहात पंचामृताने महाअभिषेक केला जाईल.

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरु आहेत. येथील जिल्हाधिकारी मयूर दीक्षित यासाठी परिश्रम घेत आहेत. केदारनाथाचं मंदिर 10 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलंय. मोदी यांचा हा सहावा केदारनाथचा दौरा आहे.

भोले शंकराचे केदारनाथ पाहा कसं सजलंय…

रुद्रप्रयाग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मयूर दीक्षित यांनी केदारनाथ येथील रोपवे प्रकल्पाची माहिती दिली. पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन होईल.

सोनप्रयाग ते केदारनाथ धामापर्यंत हा रोपवे असेल. जवळपास  13 किलोमीटर. या मार्गात चार स्टेशन असतील. जेणेकरून प्रवाशांना सहजपणे मधल्या स्टेशनवर उतरता किंवा चढता येईल. 2,430 कोटी रुपये निधीद्वारे हा प्रकल्प पूर्ण केला जाईल.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांची मोठी सोय होईल. वेळही वाचेल. तसेच ट्रॅकवरील वाहतूकही विभागली जाईल. ट्रेकिंग न करता येणाऱ्यांसाठी केबल कार प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9 वाजेच्या सुमारास केदारनाथ रोपवे प्रकल्पाचं भूमीपूजन करतील. त्यानंतर 9.25 वाजता मंदाकिनी आस्थापथ आणि सरस्वती आस्थापथ प्रकल्पांचा आढावा घेतील.

सकाळी 11.30 वाजता नरेंद्र मोदी बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेतली आणि पूजा करतील. दुपारी 12 वाजता रिव्हरफ्रंट येथील प्रकल्पाला भेट देतील. 12.30 वाजता माणा गावातील रस्ते प्रकल्पाचं भूमीपूजन करतील.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.