कोण आहेत ते 120 विद्यार्थी? ज्यांना मुंबईतून सुटलेल्या Vande Bharat Express मधून मोफत प्रवासाची संधी मिळली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई ते सोलापूर तसेच मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा शुभारंभ केला. पहिल्या दिवशी यात १२० विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची संधी मिळाली.

कोण आहेत ते 120 विद्यार्थी? ज्यांना मुंबईतून सुटलेल्या Vande Bharat Express मधून मोफत प्रवासाची संधी मिळली?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 4:58 PM

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मुंबईच्या सीएसटी (CSMT) स्टेशनवरून देशातील नवव्या आणि दहाव्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. मुंबई ते सोलापूर (Mumbai Solapur) आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस आज मुंबईतून दुपारी चार वाजेच्या सुमारास सुटल्या. पंतप्रधान मोदी यांनी काही मिनिटांच्या अंतराने या दोन्ही ट्रेनचं लोकार्पण केलं. या ट्रेनमधून पहिल्याच दिवशी १२० विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची संधी मिळाली. हे विद्यार्थी केंद्र आणि राज्य सरकार तसेच रेल्वे द्वारे संचलित शाळा-संस्थांमध्ये शिक्षण गेत आहेत. विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून मुंबई ते कल्याण पर्यंतचा प्रवास मोफत करण्याची संधी देण्यात आली.

फेसबुक, ट्विटर, युट्यूब, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाद्वारे सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे १० हजार व्हिडिओ तयार करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वेने निश्चित केले आहे. वंदे भारत एक्सप्रेस, बुलेट ट्रेन आणि भारतीय रेल्वेचे आधुनिकीकर, रेल्वेतील स्वच्छता अभियान यासारख्या मुद्द्यांवर निबंध, कविता, चित्रकला आणि वाद-विवाद स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं.

‘वंदे भारतचा डबल डोस’

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईहून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचं वर्णन महाराष्ट्राला डबल डोस अशा शब्दात केलं आहे. या आशयाचं ट्विट त्यांनी केलंय.

कोणत्या मुलांना संधी मिळाली?

कुलाबा येथील केंद्रीय विद्यालय आणि कल्याण रेल्वे स्कूलसहित एकूण १९ शाळांमध्ये उपरोक्त स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना वंदे भारत एक्सप्रेसमधून मोफत प्रवासाची संधी देण्यात आली. सीएसटी ते शिर्डी आणि सीएसटी ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ६०-६० विद्यार्थी प्रवास करणार होते.

दोन ट्रेनचा तीन टप्प्यात प्रवास

या दोन्ही ट्रेनचा प्रवास तीन टप्प्यात असेल. पहिल्या रुटवरील वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटी ते कल्याण, कल्याण ते नाशिक, नाशिक ते शिर्डी असा प्रवास करेल. तर दुसरी सीएसएमटी ते कल्याण, कल्याण ते पुणे आणि पुणे ते सोलापूर अशा मार्गाने धावेल.सीएसटी स्टेशनवरून बसलेले हे विद्यार्थी कल्याणमध्ये उतरतील. तर कल्याणमधून विद्यार्थ्यांची दुसरी टीम ट्रेनमध्ये चढेल.

३ ते ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेले यूट्यूबर्स आणि इन्फ्लूएंसर्स यांनाही वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवासाची संधी मिळेल. फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती पोहोचवण्यासाठी रेल्वे विभागातर्फे ही योजना आखण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.