नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची थोड्याच वेळात साधरणतः 11 वाजता वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (video conferencing) च्या माध्यमातून बैठक होणार आहे. यावेळी ते सरकारी योजना (government schemes) आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी, त्यांची प्रगती आणि सध्याची स्थिती याबाबत झाडाझडती घेणार असल्याचे समजते. यातून त्या योजनेसमोरील आव्हाने नेमकी काय आहेत, ती कशी सोडवता येतील, हा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे.
योजनांना वेग देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध जिल्हाधिकाऱ्यांशी त्या जिल्ह्यातील सरकारी योजनांबाबत चर्चा करतील. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांसह जिल्ह्यातील विविध विभागांद्वारे मिशन मोडमध्ये विविध योजनांना वेग देण्याचा प्रयत्न असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने देशभरातील वाढ आणि विकासातील असमानता दूर करण्यासाठी सातत्याने अनेक पावले उचलली आहेत. सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि सर्वांसाठी सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेशी सुसंगत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Prime Minister Narendra Modi will interact with DMs of various districts tomorrow, on 22nd January via video conferencing. He’ll take direct feedback about the progress and present status of implementation of government schemes and programmes in the districts: PMO
(File photo) pic.twitter.com/LtQk5qhUDj
— ANI (@ANI) January 21, 2022
अमेरिकेच्या अध्यक्षांना टाकले मागे
दरम्यान, मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 71 टक्के मान्यता रेटिंगसह पीएम मोदी सर्वात लोकप्रिय जागतिक नेते म्हणून अव्वल ठरले आहेत. त्यांनी याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि इतर अनेक राजकीय व्यक्तींना मागे टाकले आहे. पंतप्रधान मोदींनंतर या यादीत मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांचे रेटिंग ६६% आहे. यानंतर तिसरा क्रमांक इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा आहे. त्याला 60% रेटिंग मिळाले आहे.
2020 च्या तुलनेत घसरण
2021 मध्ये जाहीर झालेल्या मान्यता रेटिंगच्या तुलनेत यावेळी पीएम मोदींच्या मंजुरी रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे. जरी पंतप्रधान यावेळी प्रथम क्रमांकावर असूनही सर्वोच्च मान्यता रेटिंग मिळवत आहेत, परंतु त्यांचे रेटिंग 2020 च्या तुलनेत अजूनही खाली आले आहे. मॉर्निंग कन्सल्टने आपल्या मे 2020 च्या अहवालात पंतप्रधान मोदींना 84% मान्यता रेटिंग दिली आहे. यावेळी 13 ते 19 जानेवारी 2022 दरम्यान गोळा केलेल्या डेटाच्या आधारे जागतिक नेत्यांची मान्यता रेटिंग निश्चित करण्यात आली आहे. ही रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ नागरिकांच्या 7-दिवसांच्या हलत्या सरासरीवर आधारित आहेत.
नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार; अशी असेल रचना