Narendra Modi : पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेली चूक नेमकी कुणामुळे? उत्तर मिळालं!
जानेवारी 2022मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा भटिंडा येथील उड्डाणपुलावर अडकून पडला होता. पंजाबमधील शेतकऱ्यांनी हा ताफा अडवल्याचं सांगितलं जात होतं. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेली सगळ्यात मोठी चूक मानली जात होती.
नवी दिल्ली : 5 जानेवारी रोजी पंजाब दौऱ्यावर (PM Security breach) असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा ताफा एका उड्डाणपुलावर अडकून राहिला होता. शेतकऱ्यांच्या एका गटाने मोदींचा मार्ग रोखला होता. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतली सगळ्यात मोठी चूक असल्याचं नंतर समोर आलं होतं. या प्रकरणावरुन राजकारण तापलेलं होतं. त्यानंतर या घटनेतील गंभीर दखल घेत हे संपूर्णप्रकरण गृह विभागानंतर सुप्रीम कोर्टातही (Supreme Court) गेलं होतं. दरम्यान, या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीला नेमकं जबाबदार कोण होतं, हे स्पष्ट झालंय. या अहवालात पंजाबचे एसएसपी हरमनदीप सिंग हंस यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. आपलं कर्तव्य पार पाडण्यात हरमनदीप सिंग हंस हे पंजाबचे एसएसपी अयशस्वी राहिले, आणि त्यामुळे मोदींच्या सुरक्षेत चूक झाली, असं नमूद करण्यात आलं आहे.
जानेवारी 2022मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा भटिंडा येथील उड्डाणपुलावर अडकून पडला होता. पंजाबमधील शेतकऱ्यांनी हा ताफा अडवल्याचं सांगितलं जात होतं. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेली सगळ्यात मोठी चूक मानली जात होती. याप्रकरणी तत्कालीन पंजाब सरकारवरही केंद्र सरकारमधील नेत्यांकडून टीका करण्यात आली होती. खुद्द नरेंद्र मोदी यांनीही तो प्रसंग किती थरारक होता, हे एका भाषणात बोलताना सांगितलं होतं.
PM security breach in Punjab in January 2022 | Supreme Court reads report filed by five-member Committee headed by a retired top court judge, Justice Indu Malhotra, as per which Ferozepur SSP failed to discharge his duty to maintain law and order. pic.twitter.com/1DoaKY1mFq
— ANI (@ANI) August 25, 2022
आजच्या सुनावणीत काय झालं?
गुरुवारी झालेल्या सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायपूर्वी रमण्णा यांनी नेमून दिलेल्या समितीची अहवाल वाचला. या अहवालात हरमनदीप सिंह हंस यांच्याकडे पुरेसा वेळ असताना आणि पोलीस बळ असतानाही ते शेतकऱ्यांना रोखण्यात अयशस्वी ठरले. कर्तव्यावर असलेल्या हंस यांनी कसून केल्यामुळे मोदींच्या सुरक्षेत चूक झाली, असं स्पष्टपणे म्हटलं केलंय. आता हा अहवाल सरकारला पाठवण्यात येईल, त्यानंतर ते त्यांच्यावर कारवाई केली जाईल.