पंतप्रधान तीन राज्यातील नव्या वंदेभारतना हिरवा झेंडा दाखविणार, तुमचे राज्य आहे का ?
वंदेभारत एक्सप्रेस आता तीन राज्यातील कनेक्टीव्हीटी वाढविणार आहे. पंतप्रधान यांच्या हस्ते आज शनिवार 31 ऑगस्ट रोजी पंतप्रधान तीन वंदेभारतना हिरवा झेंडा दाखविणार आहेत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 31 ऑगस्ट रोजी तीन राज्यातील नव्या वंदेभारत एक्सप्रेसना दूरचित्र संवाद शैलीने हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या आत्मनिर्भर अंतर्गत मेक इन इंडिया योजनेतील वंदेभारत एक्सप्रेस या अत्याधुनिक आणि वेगवान ट्रेनमुळे प्रवाशांना विमानाप्रमाणे रेल्वे प्रवास घडत आहे. या वंदेभारत एक्सप्रेस धार्मिक पर्यटनासाठी सुरु झाल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहेत.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते दूरचित्र संवादाच्या माध्यमातून नवीन तीन वंदेभारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला जात आहे. मेरठ ते लखनऊ, मदुराई ते बंगळुरु आणि चेन्नई ते नागरकॉईल या मार्गांवर या ट्रेन चालविण्यात येणार आहेत. या तीन नव्या वंदेभारत एक्सप्रेसने उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या शहरातील कनेक्टीव्हीटी वाढणार आहे.
प्रवासाच्या वेळेत मोठी बचत
मेरठ सिटी लखनऊ वंदेभारत एक्सप्रेसमुळे या दोन शहरातील सध्या सुरु असलेल्या वेगवान ट्रेनच्याही तुलनेत एका तासांची बचत होणार आहे. चेन्नई इग्नोअर नागरकॉईल वंदे भारत आणि मदुराई बंगळुरु जलद ट्रेन अनुक्रमे दोन तास आणि 1 तास 30 मिनिटे प्रवासाची बचत होणार आहे. आतापर्यंत देशात 100 हून अधिक वंदेभारत एक्सप्रेस सुरु झालेल्या आहेत. पहिली वंदेभारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी दरम्यान 15 फेब्रुवारी 2019 रोजी सुरु झाली होती.