G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी PM मोदी आज जपानला जाणार, 6 दिवसात 3 देशांना भेट देणार, जाणून घ्या दौऱ्याचं वेळापत्रक
हिरोशिमा येथे होणाऱ्या चार नेत्यांच्या बैठकीत आर्थिक, इंडो पॅसिफिक, पूर्व चीन समुद्र, दक्षिण चीन समुद्र यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून सहा दिवसांच्या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते तीन परिषदांमध्ये (G-7, Quad आणि FIPIC) सहभागी होणार आहेत. सर्वप्रथम ते जपानला जाणार असून जेथे ते G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत पंतप्रधान मोदींसह अनेक देशांचे नेते सहभागी होणार आहेत. तिन्ही परिषदांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे दोन डझन नेत्यांबरोब चर्चा आणि भेट घेणार आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी अनेक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत.
सहा दिवसांच्या दौऱ्यात (19-24) पंतप्रधान मोदी व्यापारी, प्रतिष्ठित व्यक्ती, विद्वान आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांनाही भेटणार आहेत. याशिवाय पंतप्रधान सिडनीमधील परदेशी भारतीयांना संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहा दिवसांच्या जपान दौऱ्याला सुरुवात होणार आहे. यानंतर ते 22 मे रोजी पापुआ न्यू गिनीला जाणार आहेत. त्याच दिवशी तो ऑस्ट्रेलियालाही रवाना होणार आहे.
पंतप्रधान मोदी 22 ते 24 मे दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये असणाप आहेत. त्यानंतर तो भारतात ते परत येणार आहेत. 23 मे रोजी ते सिडनीमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करणार असल्याचेही त्यानी यावेळी सांगितले.
जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी G-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या सहभागाबद्दल बोलताना ते म्हणाले की, या परिषदेत पंतप्रधान मोदी ग्लोबल साऊथच्या मुद्द्यावर बोलू शकतात.
तर सुझुकी यांनी सांगितले की, G-7 शिखर परिषदेच्या निकालाच्या आधारे ते G-20 अजेंडा कसा सेट करणार आहेत याविषयी पंतप्रधान मोदींनी या शिखर परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत.
ही परिषद 19 ते 21 मे दरम्यान जपानमधील हिरोशिमा येथे होणार आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा म्हणाले की, जगात एकता निर्माण करण्यासाठी G20 आणि G7 यांच्यातील समन्वय आवश्यक आहे.
त्यामुळे विकसनशील देशांसमोरील आव्हाने सोडवता येणार आहेत. या आव्हानांमध्ये अन्न आणि ऊर्जेच्या वाढत्या किमती, ऊर्जा सुरक्षा, हवामान बदल, शाश्वत विकास आणि आरोग्य यांचा समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी जपानला रवाना होणार आहेत. जी-7 शिखर परिषदेत क्वाड गटाच्या नेत्यांमध्ये बैठक होऊ शकते.
या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.
हिरोशिमा येथे होणाऱ्या चार नेत्यांच्या बैठकीत आर्थिक, इंडो पॅसिफिक, पूर्व चीन समुद्र, दक्षिण चीन समुद्र यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.