पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाला अटक
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी नुकतंच बँकेचे माजी संचालक रजनीत सिंह याला अटक केली (PMC Bank Scam Rajneet Singh arrested) आहे.
मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी नुकतंच बँकेचे माजी संचालक रजनीत सिंह याला अटक केली (PMC Bank Scam Rajneet Singh arrested) आहे. रजनीत सिंह हा भाजपच्या माजी आमदार सरदार तारा सिंह यांचा मुलगा (PMC Bank Scam Rajneet Singh arrested) आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने रजनीत सिंहला अटक केली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नववी अटक (PMC Bank Scam Rajneet Singh arrested) आहे.
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत ईओडब्ल्यू बँकेचे माजी संचालक वरयाम सिंह, व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि एचडीआयएलचे प्रवर्तक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. चौकशीनंतर माजी संचालक सुरजीत सिंह अरोडा, एचडीआयएल समूहाचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन, बँकचे माजी अध्यक्ष वरयाम सिंह आणि माजी संचालक जॉय थॉमस यांना अटक केली होती. त्याशिवाय ऑडिटर जयेश संघानी, केतन लकडावाला यांनाही अटक केली (PMC Bank Scam Rajneet Singh arrested) आहे.
PMC Bank matter: Rajneet Singh, former Director of PMC Bank & son of former BJP MLA Tara Singh, arrested by Economic Offence Wing (EOW) of the Mumbai Police. pic.twitter.com/KkHpLMPpA1
— ANI (@ANI) November 16, 2019
या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवा यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
याप्रकरणी ईडीने मोठमोठ्या धाडी टाकल्या होत्या. या धाडीत ईडीला घबाड सापडलं होत. ईडीला अलिबागमध्ये तब्बल 22 फ्लॅट सापडले असून यातील लॅविश फ्लॅटचा ईडीने ताबा घेतला (PMC Bank Scam Rajneet Singh arrested) होता.
हे कमी म्हणून की काय ईडीला एचडीआयएलच्या प्रमोटर्सच्या नावावर एक विमान असल्याचं आढळलं होतं. त्याचबरोबर एक छोटं जहाजही सापडलं असून ते मालदीवमध्ये असल्याची माहिती ईडीला मिळाली होती.
संबंधित बातम्या
PMC बँकेत RBI च्या अधिकाऱ्यांचेही पैसे अडकले, आता 10 हजार रुपये काढण्याची मुभा
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बडे मासे सापडले, वाधवान बिल्डर्सला अटक, 3500 कोटींची संपत्ती जप्त
PMC बँकेत RBI च्या अधिकाऱ्यांचेही पैसे अडकले, आता 10 हजार रुपये काढण्याची मुभा