मुंबईसह देशात 3 ठिकाणी अत्याधुनिक लॅब, उद्घाटनासाठी PMO चं उद्धव ठाकरेंना निमंत्रण
कोरोना नियंत्रणासाठी मुंबईसह देशभरात 3 ठिकाणी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज प्रयोगशाळा सुरु करण्यात येत आहेत (Launching of high ending covid testing facility).
नवी दिल्ली : वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबईसह देशभरात तीन ठिकाणी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या प्रयोगशाळा सुरु करण्यात येत आहेत (Launching of high ending covid testing facility). या प्रयोगशाळांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. 27 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रयोगशाळांचं उद्घाटन करणार आहेत. या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणाच्या कामाला मदत मिळणार आहे.
मुंबईसह देशात कोलकाता आणि नोयडा येथेही या अत्याधुनिक कोविड प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी तिन्ही ठिकाणी आयसीएमआरच्या संशोधन संस्थांची निवड करण्यात आली आहे. या सुविधेमुळे चाचणी करण्यातील वेळ कमी होणार आहे. तसेच प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांचा बाहेरच्या वातावरणाशी संपर्क कमी होऊन संसर्ग वाढण्याचा धोकाही कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या कार्यक्रमात पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील सहभागी होणार आहेत.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलेल्या निमंत्रण पत्रिकेत म्हटलं आहे, “कोविड 19 च्या साथीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारं परस्पर समन्वयातून महत्त्वाची पावलं उचलत आहेत. याचाच भाग म्हणून कोरोना चाचणीच्या सुविधांमध्ये काही अत्याधुनिक सुविधांचा समावेश केला जात आहे. यासाठी आयसीएमआर देशभरात तीन ठिकाणी अशा अत्याधुनिक सुविधांची व्यवस्था करत आहे. यात मुंबई, कोलकाता आणि नोयडातील आयसीएमआर संस्थांचा समावेश आहे.”
“या सुविधांमुळे कोरोना चाचणीतील वेळ कमी होणार आहे. तसेच प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांचा इतर कुणाशीही येणार संपर्क कमी होऊन संसर्गाचा धोकाही घटणार आहे,” असंही या निमंत्रण पत्रिकेत म्हटलं आहे.
हेही वाचा :
Cabinet Meeting: बैठकीआधी ठाकरे-पवार भेट, मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय
गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचे OSD कोरोना पॉझिटिव्ह, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही संपर्कात
पुण्यातील लॉकडाऊन हटवणार, मात्र काही निर्बंध राहणार, विकेंडच्या बंधनावरही चर्चा
Launching of high ending covid testing facility