कंडोमच्या पाकिटांवरून राजकीय राडा, पक्ष आले आमनेसामने, मतदार पडले संभ्रमात

| Updated on: Feb 22, 2024 | 8:58 PM

आंध्र प्रदेशमध्ये आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका राजकीय पक्षाने मतदारांना कंडोमचे वाटप सुरु केलंय. लोकसभा निवडणुकीपूर्वी कंडोम पाकिटे वाटप करण्याची ही नवी राजकीय नौटंकी असल्याची टीका करण्यात येत आहे.

कंडोमच्या पाकिटांवरून राजकीय राडा, पक्ष आले आमनेसामने, मतदार पडले संभ्रमात
JAGAN MOHAN REDDY
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

हैदराबाद | 22 फेब्रुवारी 2024 : निवडणुक काळात मतदारांना मतांसाठी लॅपटॉप, टॅबलेट, सायकल वाटणे तसेच पैशांची लालच देणे असे प्रकार सर्रास घडतात. पण, आंध्र प्रदेशमध्ये मात्र एका पक्षाने मात्र मतदारांना एका विचित्र वस्तूचे वाटप केलं. त्याला दुसऱ्या विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. यावरून दोन्ही पक्षात मोठा राडा झालाय. मात्र या राड्यात ती वस्तू घ्यावी की नाही असा प्रश्न मात्र मतदारांना पडला. त्या पक्षाने मतदारांना दिलेली ती वस्तू आहे कंडोमची पाकिटे…

आंध्र प्रदेशमध्ये आगामी निवडणुकांपूर्वीच कंडोमवरून राजकीय गदारोळ सुरु झालाय. आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा सत्ताधारी पक्ष वायएसआर काँग्रेस पक्ष (YSRCP) आणि प्रमुख विरोधी पक्ष तेलुगू देसम पार्टी (TDP) हे आमनेसामने आले आहेत. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही पक्षांनी त्यांचे निवडणूक चिन्ह असलेले कंडोम पाकिटे मतदारांना वाटण्यास सुरवात केलीय.

वायएसआर काँग्रेस पक्षाकडून (YSRCP) मतदारांना निळ्या रंगाची कंडोम पाकिटे दिली जात आहेत. यावर पक्षाचे निवडणूक चिन्ह पंखा आणि पक्षाचे नाव YSRCP असे ठळक अक्षरात लिहिण्यात आलेय. तर, TDP कडून देण्यात येणारी कंडोम पाकिटे पिवळ्या रंगाची आहेत. त्यावर पक्षाचे TDP हे नाव इंग्रजीमध्ये देण्यात आले आहे. तसेच, त्यावर पक्षांचे निवडणूक चिन्हही छापण्यात आले आहे.

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांचे निवडणूक चिन्ह असलेली कंडोमची पाकिटे पक्ष कार्यकर्त्यांद्वारे मतदारांमध्ये वाटली जात आहेत. यावरून दोन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून कंडोम पाकिटे वाटण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे मतदार मात्र संभ्रमात सापडला आहे.

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या YSRCP पक्षाने विरोधी पक्ष टीडीपीवर टीका करताना ते आणखी किती खालच्या पातळीवर जाणार आहेत असा सवाल केलाय. कंडोम वाटपाने हे काम थांबणार आहे की त्यापुढे जाऊन तो पक्ष अजून जनतेला व्हायग्राचे वाटप सुरू करणार आहे” असा टोलाही लगावला आहे. त्यावर टीडीपीने या टोल्याला प्रत्युत्तर देताना वायएसआरसीपीचे निवडणूक चिन्ह असलेली एकसारखी कंडोमची पाकिटे पोस्ट केली आहेत. त्याचे आधी त्यांनी उत्तर द्यावे मग आम्हाला प्रश्न विचारावा असे म्हटले.