Nitin Gadkari | कोरोनावर मात केल्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा योगाभ्यास, पाहा व्हिडीओ…

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच नितीन गडकरी यांनी देखील रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी योगाचा आधार घेतला आहे.

Nitin Gadkari | कोरोनावर मात केल्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा योगाभ्यास, पाहा व्हिडीओ...
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 4:37 PM

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरित्या मात देखील केली होती. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच नितीन गडकरी यांनी देखील रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी योगाचा आधार घेतला आहे. वैद्यकीय सल्ला घेऊनत्यांनी घरीच काही व्यायाम प्रकार करण्यास सुरुवात केली आहे (Post Covid 19 rehabilitation exercise by minister Nitin Gadkari).

इतकेच नव्हे, तर त्यांनी कोरोनावर मात करणाऱ्या सर्वांनाच वैद्यकीय सल्ला घेऊन व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. ‘व्यायाम आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. जागतिक महामारी ‘कोव्हिड19’ने आपल्याला पुनर्जागृत केले आहे. या विषाणूच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना या पद्धतींचा विशेष फायदा झाला आहे. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही नियमित व्यायाम आसन करत आहे’, असे म्हणत त्यांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

तुम्ही देखील योगा करा!

‘या व्यायामाचा मला खूप फायदा झाला आहे. यामुळे मला रोज ताजेतवाने वाटते. म्हणूनच हा अनुभव मी तुम्हा सर्वांसह शेअर करत आहे. कारण ही आसने केल्याने तुम्हालाही बरे वाटेल. मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे व्यायाम करून पहा’, असा सल्ला देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना दिला आहे (Post Covid 19 rehabilitation exercise by minister Nitin Gadkari).

योगा-व्यायाम

नितीन गडकरी यांनी या व्हिडीओमध्ये काही व्यायामप्रकार केले आहेत. यात श्वासाच्या नियंत्रणावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

  1. ब्रीथिंग कंट्रोल : हा व्यायाम प्रकार श्वासप्रकिया नियंत्रित आणि सुरळीत करण्यासाठी केला जातो.
  2. लीप ब्रीथिंग : यामुले शरीरातील अतिरिक्त कार्बनडायऑक्साईड बाहेर निघून फुप्फुस मोकळे होते.
  3. कँडल ब्लोविंग : मेंबात्त्यांना फुंकर मारण्याच्या या व्यायाम प्रकारामुले श्वसन मार्गातील अडथळे दूर होतात.
  4. बलून ब्लोविंग : फुगा फुगवल्यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
  5. थोरॅसिक मोबिलिटी : या व्यायामामुळे अधिकाधिक हवा आपल्या फुप्फुसापर्यंत पोहोचते.

यातील काही व्यायाम प्रकार तुम्ही घरच्या घरी देखील करून पाहू शकता. मात्र, कुठलाही व्यायाम करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे योगा करावेत.

(Post Covid 19 rehabilitation exercise by minister Nitin Gadkari)

हेही वाचा :

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.