Success Story : मानलं पोराला, कारगिल युद्धात शहीद वडिलांचं पोराने स्वप्न पूर्ण केलंच!
कारगिल युद्धात शहीद झालेल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलाने नऊ वेळा एसएसबी चा इंटरव्यू दिला आहे. त्यानंतर त्याची निवड इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये झाली.
मुंबई : वडील आणि मुलाचं नातं काही वेगळंच असतं वडील आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असतात त्याच्या शिक्षणासाठी, त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील खूप कष्ट घेताना दिसतात. तसेच मुलंही आपल्या वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घेताना दिसतात. तर असंच एका मुलाने आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतकी कठोर मेहनत घेतली आहे की तुम्ही ऐकून नक्कीच चकीत व्हाल.
कारगिल युद्धात शहीद झालेल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलाने नऊ वेळा एसएसबी चा इंटरव्यू दिला आहे. त्यानंतर त्याची निवड इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये झाली. या मुलाच्या वडिलांचं स्वप्न होतं की त्यानं भारतीय सैन्यात अधिकारी व्हावं.
कारगिल युद्धात शहीद झालेल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलगा प्रज्वलने कॉमन ऍडमिशन टेस्ट (CAT) उत्तीर्ण केली. मात्र त्याने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयआयएमची (IIM) ऑफर नाकारली आणि तो इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये भरती झाला. 9 वेळा एसएसबी चा इंटरव्यू दिल्यानंतर प्रज्वलची भारतीय सैन्यात निवड झाली
प्रज्वल च्या जन्माच्या 45 दिवसानंतर त्याचे वडील लांस नायक कृष्णजी समरित हे 1999 मध्ये कारगिल युद्धात शहीद झाले होते. पण प्रज्वलच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मोठ्या मुलाने भारतीय सैन्यात भरती व्हावे आणि मोठा अधिकारी व्हावं. पण त्यांच्या मोठ्या मुलांनं इंजीनियरिंग मध्ये करिअर केलं. त्यामुळे 23 वर्षीय प्रज्वलने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि ते स्वप्न पूर्ण केलं.
वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करताना प्रज्वलचा हा प्रवास खूप कठीण होता. त्याला त्याचे ध्येय गाठण्यासाठी नऊ वेळा एसएसबी ची मुलाखत द्यावी लागली होती, त्यानंतर त्याला यश मिळालं. प्रज्वलने सांगितलं की, हा माझा शेवटचा प्रयत्न होता. मी कॉमन ऍडमिशन टेस्ट क्रॅक केली आणि या महिन्यात मला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) इंदोर आणि खोजीकोड यांच्याकडून ऑफर मिळाल्या.