Pramod Sawant : प्रमोद सावंतांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, मंत्रिमंडळात गोमंतक पक्षाला स्थान नाही, कोण आहेत नवे मंत्री?
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत आज दुसऱ्यांदा शपथ घेतलीय. यावेळी सावंत यांच्यासह आठ मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र, पहिल्या यादित अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला स्थान मिळू शकलं नाही.
पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत (Pramod Sawant) आज दुसऱ्यांदा शपथ (Goa CM Oath Taking Ceremony) घेतलीय. गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील. यावेळी सावंत यांच्यासह आठ मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पार पडणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Miniter Amit Shah) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा या शपथविधी सोहळ्यासाठी गोव्यात आले होते. या सोहळ्याला व्हीव्हीआयपी गेस्ट येणार असल्याने तब्बल दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, आज फक्त आठ मंत्र्यांचा शपथविधी झाला. पहिल्या यादित अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला स्थान मिळू शकलं नाही. तीन अपक्षांपैकी आलेक्स रेजिनाल्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांना आज मंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
कोण आहेत नवे मंत्री?
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची प्रमोदी सावंत यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. तर तर गोव्याचे 14वे मुख्यमंत्री आहेत. तर त्यांच्यासोबत विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, मौविन गोडीन्हों, रवि नायक, निलेश काब्रल, रोहण खौंटे, अटॉनोसियो मोन्सेरात आणि गोविंद गौड आदी नेते पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
मुख्यमंत्र्यांना म्हैसूर पाक आवडतो
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना म्हैसूर पाक आवडतो. अधिवेशन असल्यामुळे दोन दिवस मुख्यमंत्री घरी येणार नाहीत. त्यामुळे त्यांना म्हैसूर पाक पाठवणार. स्वयंपूर्ण गोव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काम करावं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलोचना सावंत यांनी व्यक्त केली आहे. महिलांना हक्काच्या घरासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्यात.
गोमंतक पक्षाला स्थान नाही
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली. यावेळी इतर आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली. मात्र, पहिल्या यादित अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला स्थान मिळू शकलं नाही. तीन अपक्षांपैकी आलेक्स रेजिनाल्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांना आज मंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
इतर बातम्या
Parliament Members Visit Baramati : जेव्हा देशभरातील खासदार बारामतीला भेट देतात…
Revenge | बहिणीचा नकार भावाच्या जीवावर, प्रियकराकडून सूड, प्रेयसीच्या चिमुकल्या भावाची हत्या