प्रशांत किशोर आणि ममतांच्या तृणमूल काँग्रेसचा वाद वाढला, कुठे मिठाचा खडा पडला?

प्रशांत किशोर यांची कंपनी I-PAC आणि TMC यांच्यातील वाद वाढत चालला आहे. राज्य सरकारमधील मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांची परवानगी न घेता काही ट्विट केल्याचा मोठा आरोप केला आहे. आता या वादारून ममता बॅनर्जी यांनी उद्या पक्षाची तातडीची बैठक बोलावली आहे.

प्रशांत किशोर आणि ममतांच्या तृणमूल काँग्रेसचा वाद वाढला, कुठे मिठाचा खडा पडला?
प्रशांत किशोर-टीएमसी वाद वाढणार?
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 11:39 PM

पश्चिम बंगाल : प्रशांत किशोर हे देशाच्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे. प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना काहीजण किंगमेकरही म्हणातात. त्यांना त्यांच्या निवडणुकीतल्या खास रणनितीसाठी ओळखलं जातं. गेल्या वर्षी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत (West Bengal Elections) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) आणि त्यांचा पक्ष टीएमसीला प्रशांत किशोर यांची पूर्ण मदत मिळाली होती. किशोर यांच्या कंपनी I-PAC नेही निवडणूक रणनीती बनवण्यात मोठी भूमिका बजावली. पण आता I-PAC आणि TMC मधील वाद वाढू लागला आहे. या वादाचा आत्ताचा एपिसोड ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांच्याबाबत आहे, ज्यांनी दावा केला आहे की त्यांच्या अकाऊंटवरून “वन मॅन वन पोस्ट” संदर्भात काही पोस्ट शेअर केल्या गेल्या आहेत. याबाबत त्यांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. असे वृत्त आज तक या वृत्तसंस्थेने दिले आहे.

वन मॅन वन पोस्टवरून टीएमसीमध्ये गदारोळ

TMC ने गेल्या वर्षी जूनमध्ये वन मॅन वन पोस्ट उपक्रम सुरू केला होता. मग I-PAC कंपनीनेही त्याला मान्यता दिली आणि अनेक तरुण कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांची बाजू मांडली. पण त्यानंतर कोलकाता महापालिका निवडणुकीसाठी फिरहाद हकीम यांना तिकीट देण्यात आले, तेव्हा ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला. अशा परिस्थितीत वन मॅन वन पोस्टच्या दाव्याबाबत पक्षांतर्गत प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र आता या उपक्रमामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. टीएमसी सरकारमधील मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितले की, त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांची परवानगी न घेता ट्विट करण्यात आले आहेत. याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. आता या वादावर I-PAC नेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. I-PAC च्या माहितीनुसार कंपनी कोणत्याही राजकारण्याची डिजिटल मालमत्ता वापरत नाही. जो कोणी असे दावे करत आहे, त्याला एकतर माहिती नाही किंवा तो खोटे बोलत आहेत, असे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले आहे. त्याचवेळी हे देखील ठळकपणे सांगितले गेले आहे की तयार केलेली सोशल मीडिया अकाऊंट बंगालच्या निवडणुकीपूर्वीच सक्रिय होती. नंतर सर्व पक्षाकडे सुपूर्द करण्यात आली आणि प्रत्येक निर्णय पक्षाकडूनच घेतला जात होता.

अभिषेक बॅनर्जी राजीनामा देणार?

सध्या तरी या वन मॅन वन पोस्ट उपक्रमामुळे टीएमसीमध्येच अंतर्गत युद्ध सुरू झाले आहे. अभिषेक बॅनर्जी यांना युवा नेत्यांचा पूर्ण पाठिंबा मिळत असून, या सर्वांच्या वतीने ट्विट करून समर्थन दर्शवले जात आहे. मात्र यामुळे अनेक दिग्गज संतप्त झाले आहेत. आता ममता बॅनर्जी स्वबळावर पक्षाला पुढे नेऊ इच्छित असल्याचीही बातम्याही पसरत आहेत. त्यांना यामध्ये कोणत्याही बाहेरील एजन्सीचा हस्तक्षेप नको आहे. त्यामुळेच प्रशांत किशोर यांच्यासोबतच्या त्यांच्या मतभेदाच्या बातम्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. सध्या हा वाद सोडवण्यासाठी ममता बॅनर्जी स्वतः अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. त्यांनी उद्या म्हणजेच शनिवारी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला अभिषेक बॅनर्जीही उपस्थित राहणार आहेत. अभिषेक बॅनर्जी यांची सकारात्मक चर्चा झाली नाही तर ते आपल्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामाही देऊ शकतात अशाही चर्चा आहे.

Yogi Government : सीएए आंदोलकांकडून दंड वसुली थांबवा; योगी सरकारला सुप्रीम कोर्टाने झापले

Terrorist Attack in Jammu-Kashmir : बांदीपोरामध्ये सुरक्षा दलांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद, 4 जखमी

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.