अहमदाबादमध्ये 15 ऑक्टोबरपासून ‘प्रवासी गुजराती पर्व 2022’ चा शुभारंभ!
संस्कृती, विज्ञात, अध्यात्मिकता, कला, व्यवसाय, कल्याण, या सगळ्यांच मूल्यांवर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन
TV9 नेटवर्क (TV9 Network) आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन्स इन नॉर्थ अमेरिका, (AIANA) गुजरातच्या वतीने एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं नाव प्रवासी गुजरात पर्व 2022 असं आहे. 15 ऑक्टोबरपासून या खास कार्यक्रमाला अहमदाबादमध्ये (Ahmedabad) सुरु होणार आहे. तीन दिवसांच्या या विशेष सोहळ्यादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
येत्या शनिवारपासून या कार्यक्रमाची सुरुवात होईल. गुजरातमधील उपक्रम आणि गौरव साजरा करण्यासाठी या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 17 ऑक्टोबरला या कार्यक्रमाचा समारोप केला जाईल. या तीन दिवसीय कार्यक्रमाला भारतासह 20 पेक्षा जास्त देशातील दिग्गज पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे.
प्रवासी गुजराती पर्व-2022 मध्ये 20 हून जास्त देशांमधील दिग्गज तर येणार आहेतच. पण सोबतच भारताच्या 18 राज्यांमधील अडीच हजारहून जास्त गुजराती बांधवही सहभागी होणार आहे. चार प्रमुख उद्देशांसाठी गुजराती पर्व साजरा केला जातोय. कनेक्ट, कम्युनिकेशन, कंट्रीब्यूट आणि सेलिब्रेट या प्रमुख त्तत्वांवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.
- कनेक्ट – प्रवासी गुजराती पर्वामध्ये व्यवसायातील मातब्बर आणि प्रभावशाली लोकांनी एकत्र यावं आणि त्यांच नेटवर्किंग फ्लॅटफॉर्म तयार व्हावा, असा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवण्यात आला आहे.
- कम्युनिकेशन – एकाच प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या क्षेत्रातले, संस्थांमधील प्रभावशाली व्यक्ती एकत्र याव्यात, त्यांचा एकमेकांशी संवाद व्हावा आणि सोबत एकत्र येऊन त्यांनी काही चांगल्या गोष्टींवर भर द्यावा, असा ध्येय आखण्यात आलंय.
- कंट्रीब्यूट – गुजरात राज्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपआपल्या नवनव्या संकल्पना सांगून, गुजरातच्या विकासात हातभार लावण्यात हा कार्यक्रम मोलाची भूमिका बजावेल.
- सेलिब्रेट – वेगवेगळ्या माध्यमातून गुजरातच्या कला आणि संस्कृतीला साजरं करण्याचं निमित्त हा कार्यक्रम असेल.
प्रवासी गुजराती पर्वासोबत व्यवसाय, संस्कृती यासोबत अर्थकारण, आध्यात्मिकेतसोबतच विज्ञान, कल्याणासोबत मनोरंजन या उपक्रमांवर एक सर्वव्यापी कार्यक्रम आखण्यात आला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात गुजरात बद्दल बोलताना प्रत्येक गुजराती माणसाची मान अभिमानाने उंचावलेली असते, इतकी उंची गुजरातने गाठली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हटलं होतं. आता या कार्यक्रमाची उत्सुकताही शिगेला पोहोचलीय.