Monsoon Update : दिल्ली मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस, येलो अलर्ट जारी, जाणून घ्या पुढील आठवठाभर कसं असेल हवामान

Weather Update : काल मुंबईत आणि दिल्लीत मान्सूनपूर्व पाऊस चांगलाचं झाला आहे. मुंबईत काल दुपारी पावसाचा जोर वाढला आहे. काही हवामान तज्ज्ञांचं असं मत आहे की, मागच्या काही वर्षांचा विचार केल्यास यंदाच्यावर्षी पावसाची गती एकदम संत राहिली आहे.

Monsoon Update : दिल्ली मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस, येलो अलर्ट जारी, जाणून घ्या पुढील आठवठाभर कसं असेल हवामान
कणकवली, वैभववाडी,कुडाळ, सावंतवाडीसह दोडामार्ग तालुक्यात चांगलाच पाऊस कोसळत असून सकल भागात काही प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 8:53 AM

मुंबई : महाराष्ट्र (maharashtra rain update) आणि दिल्लीत (Delhi-NCR Rain) कालपासून पाऊस सुरु झाल्यापासून लोकांच्यामध्ये आनंद पाहायला मिळत आहे. परंतु हा मान्सून पाऊस नसून हा मान्सूनपूर्व पाऊस (latest Monsoon Update) असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. दिल्लीत शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली आणि मुंबईत पुढचे काही दिवस अशाचं पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे. कालच्या पावसामुळे तापमान सुध्दा चांगलचं खाली गेलं आहे. प्रत्येकवर्षी मान्सूनकडून एका सेट पॅटर्नची अपेक्षा असते. परंतु यावर्षी तशी काय अपेक्षा करता येणार नाही. यंदा चक्रीवादळ बिपरजॉयचा मान्सूनच्या वेगावर मोठा परिणाम झाला असल्याचं सुद्धा अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

यावर्षी पावसाची गती कमी झाली

मान्सून पहिल्यांदा केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात दाखल होतो. देशात दक्षिण भागात पहिल्यांदा पाऊस होतो. त्यानंतर दक्षिण-पश्चिम भागातून मान्सून पाऊस पुढे सरकतो. तिथून पुढे सरकल्यानंतर संपूर्ण देशात पाऊस सुरु होतो. देशातील काही राज्यातील इतर मागच्या पावसाळ्याची तुलना केल्यानंतर तिथली पावसाची गती कमी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू, कश्मीर आणि लडाख, चंडीगढ आणि दिल्ली, हरियाणा या राज्यांमध्ये मान्सून पुढे सरकण्यास सध्या परिस्थिती अनुकूल झाली आहे. पुढच्या 48 तासात गुजरात, राजस्थान आणि पंजाब राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याकडून येलो अलर्ट

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढच्या आठवड्यात हा पाऊस असाचं सुरु राहणार आहे. काल दिल्लीतलं तापमान 37.2 डिग्री सेल्सियस होतं. पाऊस पडल्यानंतर तिथलं तापमान खाली गेलं आहे. सध्या तिथं 30.4 डिग्री सेल्सियस तापमान दाखवत आहे. हवामान खात्याकडून पुढच्या सहा दिवसांसाठी उत्तर पश्चिम भारतात येलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर पुढच्या आठवड्यात तापमान कमी आणि जास्त होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातल्या नाशिक, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढच्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.