किनाऱ्यालगतच्या गावांना बिपरजॉयचा धोका; PMO कार्यालयही प्रत्येक गावावर लक्ष्य ठेवणार
गुजरातच्या गृहमंत्र्यांनी बोलताना सांगितले की, बुधवारी दुपारनंतर या भागात जोरदार वादळ आणि पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आता वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी टीव्ही 9 भारतवर्षशी विशेष संवाद साधताना सांगितले की, गुजरातच्या किनारपट्टी भागातील प्रत्येक गाव पंतप्रधान कार्यालयाबरोबर जोडले गेले आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीवरही पावसाळ्यातील दिवसात बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे. सिंघवी यांनी सांगितले की, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. त्याच बरोबर आता पीएमओ कार्यालय प्रत्येक जिल्हा युनिटबरोबर थेट संपर्कात राहणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बैठक घेतली असून त्यामध्ये जिल्हा युनिट आणि निवडून आलेले प्रतिनिधी व मंत्रीही उपस्थित होते.
कोणत्याही जिल्ह्याला कोणत्याही प्रकारची आपत्कालीन गरज भासल्यास ती तत्काळ पुरविली जाईल, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
या बैठकीवेळी हर्ष संघवी यांनी सांगितले की, किनाऱ्यालगत असणारी अनेक गावे आहेत, 5 किलोमीटरच्या आत 38 गावं आहेत.
त्याबरोबरच 10 किलोमीटर परिसरात 44 गावे येतात. या सर्व गावांतील सखल भागातील एकूण 5035 लोकांची त्यांच्या कच्च्या घरातून सुटका करण्यात आली आहे. यासोबतच या उद्योगात 1500 लोकं काम करत आहेत, त्यांनाही सुरक्षित स्थळी हलवल्याचेही सांगण्यात आले आहे.
गुजरातच्या गृहमंत्र्यांनी बोलताना सांगितले की, बुधवारी दुपारनंतर या भागात जोरदार वादळ आणि पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे आता पाऊस डोळ्यासमोर ठेऊन प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले. द्वारकामधील 3 एनडीआरएफ तुकड्या, 2 एसडीआरएफ तुकड्या आणि ओखा येथील तटरक्षक नौदल आणि बीएसएफ केंद्र त्यांच्यामध्ये विलीन करण्यात आले आहेत.
अधिक नुकसान होण्याची शक्यता असलेल्या समुद्रालगतच्या सर्व गावांना स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे. जोरदार वादळामुळे नेटवर्क/मोबाईल टॉवरचे नुकसान होईल आणि कुठेतरी दळणवळणावर वाईट परिणाम होईल. यामुळे दळणवळणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकारने विशेष व्यवस्था केली आहे.
गावात बीएसएफ आणि इतर फौजा तैनात करण्यात आल्या आहेत. महामार्गाच्या अंतरानुसार गावाला प्राधान्य देण्यात आले आहे. वादळ शमल्यानंतर परिस्थितीला तोंड देण्यासाठी रणनीतीही आखली जात आहे.
समुद्रालगतच्या गावातील गर्भवती महिलांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जेणेकरून वादळाच्या मध्यभागी कोणत्याही प्रकारची हालचाल झाली तर टाळता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.