51 लाख लोकांना लस, 48 सरकारी, 100 खासगी रुग्णालयं सज्ज, केजरीवालांचा लसीकरणाचा मेगाप्लॅन

Corona Vaccination Programme | राजधानी दिल्लीत पहिल्या टप्प्यात 51 लाख लोकांना कोरोना लस दिली जाणार आहे

51 लाख लोकांना लस, 48 सरकारी, 100 खासगी रुग्णालयं सज्ज, केजरीवालांचा लसीकरणाचा मेगाप्लॅन
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 12:23 PM

नवी दिल्ली : कोरोनाला हरवण्यासाठी ज्या संजीवनीची सर्वाधिक गरज आहे, ती कोरोनाची लस लवकरच बाजारात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना (covid warriors) ही लस दिली जाईल, यासाठीची सगळी तयारी सरकारनं (Kejariwal Government) पूर्ण केलीय. राजधानी दिल्लीत (New Delhi) पहिल्या टप्प्यात 51 लाख लोकांना कोरोना लस (Corona Vaccine) दिली जाणार आहे.  दिल्ली व्हॅक्सिनेशन प्रोग्राम कोविड टास्क फोर्सचे सदस्य (Delhi Vaccination programme task forse ) आणि मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधील प्रोफेसर डॉक्टर सुनील गर्ग (Sunil Garg) यांनी टीव्ही9 शी बोलताना ही माहिती दिली. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिकानं (Oxford and Astrazeneca vaccine)विकसित केलेली आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये (Serum Institute) निर्माण झालेली कोविशिल्ड (Covishield) या लसीला मंजुरी मिळण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही लसीकरण मोहिम सुरु होण्याची दाट शक्यता आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसांत नागरिकांना कुठली लस दिली जाणार, यावरुन पडदा उठण्याची शक्यता आहे. (Preparations for corona vaccination campaign completed in New Delhi)

कशी आहे लसीकरण मोहिमेची दिल्लीत तयारी?

कोरोना लसीकरणासाठी दिल्लीत 1 हजार बूथ तयार करण्यात आले आहे. यामध्ये  48 सरकारी रुग्णालयं आणि 100 खासगी रुग्णालयांचा समावेश असणार आहे. याशिवाय दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्येही लसीकरण केलं जाणार आहे. कोरोना लस साठवण्यासाठी शीतगृहांची आवश्यकता असणार आहे. यासाठी नवी दिल्लीत 603 ठिकाणी कोल्ड स्टोरेजचे चेन पॉईंट उभे करण्यात आले आहेत. शिवाय लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित आरोग्य सेवक लागणार आहेत, त्यासाठी 3 हजार 500 आरोग्य सेवकांना लसीकरणाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. शिवाय खासगी रुग्णालयातील 600 आरोग्य कर्मचाऱ्यांचाही वापर प्रशासनाकडून केला जाणार आहे.

ऑनलाईन पद्धतीनं लसीकरण मोहिम

ऑनलाईन पद्धतीनं हा लसीकरण कार्यक्रम राबवला जाणार आहे. यासाठी तुम्हाला लसीकरणाच्या अॅपवर वा वेबसाईटवर नावाची नोंदणी करावी लागेल. या नोंदणीनंतर तुम्हाला लसीकरणाची वेळ आणि बूथचा पत्ता SMSद्वारे कळवला जाईल. त्यानुसार तुम्हाला लसीकरण बूथवर पोहचावं लागेल, जिथं ही लस दिली जाईल. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत हे लसीकरण चालणार आहे.

लसीकरणाची पद्धत कशी असेल?

लसीकरणाच्या बूथवर 3 वेगवेगळ्या खोल्या असणार आहेत, पहिल्या खोलीत नागरिकांचे कागदपत्र तपासले जातील. नागरिकांची नोंद ठेवण्यासाठी आणि लसीच्या दुसऱ्या डोससाठी नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी कागदपत्रांची नोंद केली जाणार आहे. शिवाय आधीच्या आजारांचीही माहिती तुम्हाला याच कक्षात द्यावी लागेल, त्याप्रमाणे डॉक्टर काळजी घेतील. कागदपत्र तपासणीनंतर तुम्हाला लसीकरण कक्षात नेलं जाईल, जिथं तुम्हाला कोरोनाची लस दिली जाईल. कोरोना लस दिल्यानंतर तुम्हालाला 30 मिनिटांसाठी ऑब्जर्वेशन कक्षात म्हणजेच निरिक्षण कक्षात ठेवलं जाईल. जिथं तुम्हाला लसीमुळं काही दुष्परिणाम तर होत नाही ना यावर लक्ष ठेवलं जाईल. जर काही साईट इफेक्ट झाल्यास तातडीने वैद्यकीय सेवा पुरवली जाईल

कोरोना लसीचे 2 डोस गरजेचे!

कोरोनाला मुळापासून संपवण्यासाठी कोरोना लसीच्या 2 डोसची गरज लागणार आहे. यासाठी पहिली लस घेतल्यानंतर 28 दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. पहिला डोस घेतल्यानंतर बरोबर 28 दिवसांनंतर तुम्हाला पुन्हा लसीकरण बूथवर पोहचणं गरजेचं असणार आहे. यासाठी तुम्हाला रिमाईंडर मेसेजही येईल. यात तुम्हाला कधी आणि कुठल्या लसीकरण बूथवर पोहचायचं आहे, याबाबत कळवलं जाणार आहे.

कोविड योद्ध्यांना लसीकरणात प्राधान्य

कोविड योद्ध्यांना ही लस सर्वात आधी दिली जाणार आहे. यामध्ये सर्वात आधी आरोग्य सेवक आणि डॉक्टरांचा नंबर लागणार आहे. त्यानंतर पोलीस आणि इतर कोविड योद्ध्यांना ही लस दिली जाईल. दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयात यासाठी 5 बूथ तयार करण्यात येणार आहे. ज्यामध्ये कोविड योद्ध्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ:

Special Report | Corona strain | कोरोना स्ट्रेनला जग का घाबरतंय?

Corona Vaccine | भारतात चार राज्यात लवकरच कोरोना लसीकरणाचा ड्राय रन

संबंधित बातम्या: कोरोना काळात रात्रीपेक्षा दिवसा कंडोमची मागणी वाढली, पुण्यात गर्भनिरोधक गोळ्यांची सर्वाधिक विक्री

कोरोना व्हायरसचा नवा अवतार सुस्साट; ब्रिटनमधून थेट ‘या’ 19 देशांमध्ये पोहोचला

 

(Preparations for corona vaccination campaign completed in New Delhi)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.