राष्ट्रपती कोविंद यांची बायपास सर्जरी होण्याची शक्यता, एम्समध्ये दाखल

| Updated on: Mar 27, 2021 | 8:57 PM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लष्करी रुग्णालयातून आज दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (President’s condition stable, shifted to AIIMS for planned bypass procedure)

राष्ट्रपती कोविंद यांची बायपास सर्जरी होण्याची शक्यता, एम्समध्ये दाखल
President Ram Nath Kovind
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लष्करी रुग्णालयातून आज दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्समध्ये त्यांची तपासणी करण्यात आली असता डॉक्टरांनी त्यांना बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. येत्या 30 मार्च रोजी सकाळी त्यांची बायपास सर्जरी होण्याची शक्यता आहे. तथापि, राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. (President’s condition stable, shifted to AIIMS for planned bypass procedure)

छातीत दुखू लागल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना काल शुक्रवारी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज त्यांना पुढील आरोग्य तपासणीसाठी एम्समध्ये भरती करण्यात येत असल्याचं लष्करी रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. त्यानुसार दुपारी कोविंद यांना एम्समध्ये भरती करण्यात आलं.

मोदींकडून विचारपूस

यापूर्वी लष्करी रुग्णालयाने या आधी राष्ट्रपतींचं हे रुटीन चेकअप असल्याचं म्हटलं होतं. त्याबाबतचं रुग्णालय प्रशासनाने बुलेटिनही काढलं होतं. त्यात राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, बांगलादेशाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. त्यांनी राष्ट्रपतींच्या चिरंजीवांशी चर्चा केली होती.

प्रकृती अस्वस्थ्यामुळे दौरा रद्द

रामनाथ कोविंद यांचा हरिद्वारमध्ये दोन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला होता. काल ते या दौऱ्यासाठी रवाना होणार होते. यावेळी ते एका पदवीदान सभारंभात सहभागी होणार होते. मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला आहे.

कोरोनाची लस घेतली

दरम्यान, कोविंद यांनी नुकतीच कोरोनाची लसही घेतली होती. लष्करी रुग्णालयातच जाऊन त्यांनी लच टोचून घेतली होती. मुलासह ते रुग्णालयात गेले होते. राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती कोविंद यांनी इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीमेला यशस्वीपूर्वक पूर्ण करत असलेले सर्व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकांचे आभार व्यक्त केले आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी ज्यावेळी कोरोना लस घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्याही उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे. (President’s condition stable, shifted to AIIMS for planned bypass procedure)

 

संबंधित बातम्या:

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रुग्णालयात, छातीत दुखू लागल्याने भरती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टोचली कोरोना लस, कोरोना योद्धांचेही मानले आभार

पाच वर्षात भारतातले रस्ते युरोप-अमेरिकेसारखे होतील; नितीन गडकरींचं आश्वासन

(President’s condition stable, shifted to AIIMS for planned bypass procedure)