अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली आई हिराबा यांच्या पार्थिवावर अंतीम संस्कार केले. त्यानंतर दोन तासांनी त्यांनी आपलं काम सुरू केलं. सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी अहमदाबाद येथे त्यांनी आईला मुखाग्नी दिला. त्यानंतर ते अहमदाबादवरून व्हिडीओ कान्फरन्सिंगच्या माध्यमातून बंगालमध्ये आयोजित कार्यक्रमात जुळले. पंतप्रधान मोदी यांनी हावडा न्यू जलपाईगुडे वंदे भारत टेनला हिरवी झेंडी दाखविली. कार्यक्रमात सहभागी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या आईच्या निधनावर दुःख व्यक्त केलं.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आजचा दिवस तुमच्यासाठी कष्टाचा आहे. तुमची आई म्हणजे आमची आई आहे. ईश्वर तुम्हाला शक्ती देओ की, तुम्ही तुमचं काम सुरू ठेऊ शकालं. मला वाटतं की, तुम्ही काही वेळ आराम करायला हवा.
Railway and metro projects being launched in West Bengal will improve connectivity and further ‘Ease of Living’ for the people. https://t.co/Z0Hec08qh5
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
पंतप्रधान मोदी म्हणाले, बंगालच्या पुण्य धरतीला नमन. खासदी कारणामुळं तुम्ही येऊ शकला नाहीत. रेल्वे आणि मेट्रोसह काही प्रकल्पांचं उद्घाटन झालं. वंदे भारत ट्रेनसाठी तुम्हा सर्वांना अभिनंदन. गंगाजीची स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची योजना पश्चिम बंगालला देण्याचं सौभाग्य मिळालं. ७ हजार ८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात मोदी यांनी आज केली. यात कोलकाता मेट्रोची पर्पल लाईनच्या जोका-तारातला फेजचे उद्घाटन आणि राज्यातील चार प्रोजेक्टचा समावेश आहे.
मोदी यांनी नार्थ इस्ट रेल्वेच्या स्टेशनपासून न्यू जलपाईगडी रेल्वे स्टेशनच्या रीडेव्हलपमेंटची सुरुवात केली. हा ३३४ कोटी ७२ लाख रुपयांचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारा प्रोजेक्ट आहे. हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल. श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्थानाचे उद्घाटन झाले. यात १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.