पंतप्रधान नरेंद्र मोदी हे (Narendra Modi) सध्या तीन दिवशीय युरोप दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी पंतप्रधान जर्मनीत पोहोचले. जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिनमध्ये (Berlin) तेथील भारतीय लोकांनी (Indian Diaspora) मोठ्या थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. याचदरम्यान तेथील दोन मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन जिंकले त्यापैकी एक असलेल्या एका मुलीने मोदींचे छायाचित्र काढले होते. तर दुसऱ्या एका मुलाने पंतप्रधान मोदींना आपल्या आवाजात कविता ऐकवली. पंतप्रधान मोदींनी या मुलांशी संवाद साधताना म्हटले की तु काय बनवले आहे? तेव्हा ती मुलगी म्हणाली की मी तुमचे चित्र तयार केले आहे. तेव्हा परत पंतप्रधान मोदींनी या मुलीला प्रश्न केला तु माझे चित्र का बनवलेस. तेव्हा या मुलीचे उत्तर देताना म्हटले की तुम्ही माझे आवडते आयकॉन आहात. पुढे बोलताना पंतप्रधान मोदींनी या मुलीला म्हटले की, माझे हे चित्र तयार करण्यासाठी किती कालावधी लागला. तेव्हा ही मुलगी म्हणाली की, मी तुमचे चित्र एका तासात पूर्ण केले आहे.
दरम्यान जर्मनीमध्ये स्थाईक झालेल्या मात्र मुळ भारतीय वंशाच्या असलेल्या गैरांग कुटेजा यांनी सांगितले की, पंतप्रधान जर्मनीला येणार असल्याचे ऐकूणच आमचा उत्साह वाढला होता. पंतप्रधानांना भेटण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो. तब्बल 400 किलोमिटरचे अंतर पार करून आम्ही या ठिकाणी आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला भेटले, त्यांनी आमच्याशी संवाद साधला ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता आम्ही पंतप्रधानांच्या भाषणाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सूक असल्याचे कुटेजा यांनी म्हटले आहे.
दरम्यान आपल्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जर्मनीचे चांसलर ओलाफ शॉल्ज यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिनला पोहोचताच ट्विट करत आपण जर्मनीत पोहोचल्याची माहिती दिली. मोदींनी आपल्या या दौऱ्याबाबत बोलताना म्हटले आहे की, आज मी जर्मनीचे चांसलर ओलाफ शॉल्ज यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होणार आहे. तसेच विविध उदयोजकांशी संवाद साधणार आहे, आणि एका सामाजिक कार्यक्रमामध्ये देखील सहभागी होणार आहे. मला अशा आहे की, माझा हा दौरा जर्मनी आणि भारतादरम्यानचे संबंध अधिक मजबूत करेल.
It was early morning in Berlin yet several people from the Indian community came by. Was wonderful connecting with them. India is proud of the accomplishments of our diaspora. pic.twitter.com/RfCyCqJkPY
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2022