रामनवमीला पंतप्रधान मोदी यांचा रामेश्वरम दौरा, देशातील पहिल्या ‘व्हर्टिकल सी लिफ्ट ब्रीज’चे लोकार्पण होणार
ब्रिटीश काळात पामबन ब्रिजची निर्मिती करण्यात आली होताी. साल 1914 मध्ये तो बांधून पूर्ण झाला होता.या पुलाच्या निर्मितीसाठी १४ वर्षे लागली होती. या पुलाला इंजिनिअरिंग मार्व्हल म्हटले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या महिन्यात रामनवमीच्या निमित्ताने तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात विशेष पूजा करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पांबन पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हा ब्रिज इंजिनिअरिंग मार्व्हल असून ब्रिजचे उद्घाटनानंतर रेल्वे प्रवाशांसह पर्यटकांचा मोठा फायदा होणार आहे. रामेश्वरमच्या जगप्रसिद्ध रामनाथस्वामी मंदिर तामिळनाडूतील रामेश्वरम बेटावर उभारलेले प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिव शंकराला समर्पित आहे. आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.
पीएम मोदी यांनी साल 2019 मध्ये या पुलाच्या पुनर्विकास योजनेचे भूमीपूजन केले होते
रामनवमीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. ते दोन दिवस (4 आणि 5 एप्रिल) श्रीलंकेत असणार आहेत. त्यानंतर पीएम मोदी या ब्रिजचे उद्घाटन करणार आहेत.पीएम मोदी यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये या पुलाच्या पुनर्विकास योजनेचे भूमीपूजन केले होते. परंतू कोरोना काळामुळे पुलाचा संपूर्ण पुनर्विकास रेंगाळला होता. आता जुन्या पुलाच्या व्हर्टिकल लिफ्टच्या जागी नवीन अधिक क्षमतेची आणि उंचीची लिफ्ट उभारण्यात आली आहे. त्यामुळे सुमद्रातील मोठी जहाजे हा पुल पार करु शकणार आहेत.




नवीन पांबन पूल २.५ किलोमीटर लांबीचा आहे. त्याच्या उद्घटनामुळे, रेल्वे गाड्या देशाच्या मुख्य भूमी आणि रामेश्वरम बेटामधील समुद्रातील अंतर ५ मिनिटांपेक्षा कमी वेळात हे अंतर ओलांडू शकणार आहेत. जुन्या पुलाला २५-३० मिनिटे लागत होती. पांबन पूल हा आशियातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट असलेला पूल आहे.
नवा पांबन ब्रिजला नव्या तंत्रज्ञानाने पुनर्विकसित केले आहे. हा पुल २.१० किलोमीटर लांबीचा आहे. सहा एप्रिलपासून तो प्रवाशांसाठी सुरु होत आहे. पांबन पुलाची निर्मिती ब्रिटीशकाळात झाली होती. आता त्याचे नवे रुप अत्यंत आधुनिक आहे. या पुलाखालून आता ७२.५ मीटर लांबीच्या जहाजांना पुलाखालून जाता येणार आहे. हा ब्रिज जहाजे समुद्रातून जात असताना हायड्रॉलिक लिफ्टने वर उचलला जातो. त्यामुळे मोठी जहाजे पुलाखालून आरामात जाऊ शकणार आहेत.
पंबन ब्रिज देशाचा पहीला व्हर्टीकल समुद्र ब्रिज आहे. हा ब्रिज जुन्या ब्रिजची जागा घेणार आहे. जुना ब्रिज साल 1914 मध्ये बांधला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा ब्रिज रामेश्वरम बेट आणि मुख्य भारत बेटातील महत्वाचा दुवा आहे.
साल 2022 मध्ये जुना पुल बंद केला
100 वर्षांहून अधिक जुना असलेला हा समुद्री पुल स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना तिर्थयात्रा आणि रोजच्या येण्याजाण्याचा मुख्य आधार बनला होता. परंतू काळाचा याच्यावर वाईट परिणाम झाल्याने हा पुल खराब झाला होता…समुद्राचे खारे पाणी आणि वारे यामुळे हा पुल कमजोर झाल्याने हा पुल साल २०२२ मध्ये बंद करण्यात आला होता.