गेल्या 10 वर्षात जे झालं तो तर फक्त ट्रेलर.. RBI च्या कार्यक्रमात काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

90 Years of RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आज 1 एप्रिल रोजी 90 वे वर्ष पूर्ण करत आहे. या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, राज्यपाल रमेश बैस, अर्थमंत्री निर्मला सीतारमन या मान्यवरांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

गेल्या 10 वर्षात जे झालं तो तर फक्त ट्रेलर.. RBI च्या कार्यक्रमात काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
RBI च्या कार्यक्रमात पंतप्रधान काय म्हणाले ?
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 1:17 PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चा आज 90वा स्थापना दिन आहे. यानिमित्ताने मुंबईतील नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. तसेच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दासही उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. RBI च्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. RBI ही संस्था म्हणून स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरची साक्षीदार आहे असे मोदी म्हणाले.

व्यावसायिकता आणि बांधिलकीमुळे आज आरबीआयची संपूर्ण जगभरात ओळख आहे. सध्या जे आरबीआयशी निगडीत आहे, त्यांना मी खूप भाग्यवान मानतो. आज तुम्ही जे काम कराल, जी धोरणे आखाल , त्या अनुषंगाने आरबीआयच्या पुढील दशकातील दिशा ठरणार आहे. हे दशक या संस्थेला शताब्दी वर्षापर्यंत घेऊन जाणारे दशक आहे आणि विकसित भारताच्या संकल्प प्रवासासाठी हे दशक तितकेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. देशाच्या विकासासाठी भारतीय रिझर्व्ह बँक महत्त्वाची आहे, असंही पंतप्रधानांनी नमूद केलं

10 वर्षांत मोठ्या सुधारणा

‘ 2014 साली जेव्हा मी रिझर्व्ह बँकेच्या 80 व्या वर्षाच्या कार्यक्रमासाठी आलो होतो, तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. भारताचे संपूर्ण बँकिग सेक्टर अनके समस्या आणि आव्हानांशी झगडत होतं. NPA बाबत भारताच्या बँकिंग सिस्टीमची स्टेबिलीटी आणि त्याचे भविष्य याबाबत प्रत्येकाच्या मनात शंका, भीती होती. पण आज (चित्र) बघा, आज भारताची सिस्टीम ही जगात एक मजबूत आणि टिकाऊ सिस्टीम म्हणून ओळखली जाते. जी बॅंकिंग सिस्टीम बुडणार होती, ती आता नफ्यात आली आहे आणि विक्रम करतेय. जेव्हा हेतू योग्य असतो तेव्हा धोरण योग्य असते. धोरण योग्य असते तेव्हा निर्णय योग्य असतात. आणि जेव्हा निर्णय योग्य असतात तेव्हा परिणाम योग्य असतात, हे आज देश पहात आहे’ असे पंतप्रधमान मोदी म्हणाले.

मागील 10 वर्षात मोठे परिवर्तन आणणे सोपे नव्हते. पण आमचे धोरण, नियत आणि निर्णयांमध्ये स्पष्टता होती त्यामुळे हे बदल झाले. आमचे प्रयत्न दृढ आणइ प्रामाणिक होते. देशाची बँकिंग व्यवस्था कशी बदलली हा एक अभ्यासाचा विषय आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने सरकारने मोठी पावले उचलली आहेत.

अजून बरंच काम बाकी…

गेल्या 10 वर्षांत जे झालं तो फक्त ट्रेलर होता, अजून बरंच (काम) बाती आहे. आपल्याला देश अजून पुढे न्यायचा आहे. पुढल्या 10 वर्षांचं लक्ष्य स्पष्ट असणं, निश्चित असणं हे खूप गरजेचं आहे. पुढील 10 वर्षांचे लक्ष्य निश्चित करताना आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. ती म्हणजे- भारतातील तरुणांच्या आकांक्षा. भारत आज जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. तरुणांच्या या आकांक्षा पूर्ण करण्यात RBIची महत्त्वाची भूमिका आहे. 21व्या शतकात इनोव्हेशनला खूप महत्त्व असणार आहे, सरकार इनोव्हेशनवर विक्रमी गुंतवणूक करत आहे.

आपल्याला कॅशलेस अर्थव्यवस्थेतून होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवावे लागेल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या बँकिंग गरजा या देखील वेगवेगळ्या, भिन्न असू शकतात. अनेकांना फिजिकल बँकिंग आवडते तर काहींना डिजिटल बँकिंग आवडते. लोकांना सोयीसुविधा देणारे धोरण देशाने बनवण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले. कोरोना आणि युद्धात देखील महागाई दर आटोक्यात आपण ठेवला. ज्यांचे व्हिजन व्यवस्थित आहे, त्यांची प्रगती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जगातील मोठे-मोठे देश कोरोनातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत, त्याच भारतीय अर्थव्यवस्था नवे किर्तीमान स्थापित करत आहे. आरबीआय भारताचा वैश्विकस्तरावर घेऊन जाऊ शकतं, असं पंतप्रधान मोदींनी नमूद केलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.