PM MODI : येत्या 2024 लोकसभा निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टच म्हणाले की, “आम्ही…!”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्ताव दरम्यान आपलं म्हणणं मांडलं. इतकंच काय तर विरोधकांना खडेबोल सुनावले. अविश्वास प्रस्ताव कसा शुभ आहे याबाबत सांगितलं.
नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करतानाचा विरोधकांना खडेबोल सुनावण्यात सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच सांगितलं की, “देव खूप दयावान आहे. त्यांचा आशीर्वाद असल्यानेच विरोधकांना अविश्वास आणण्याची बुद्धी सुचली.” यासह त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आणि लोकसभा निवडणूक 2024 साली काय स्थिती असेल? याबाबत भाकीत सांगितलं.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, “जनतेने आमच्यावर वारंवार विश्वास वर्तवला आहे. यामुळे देशातील जनतेचं आभार व्यक्त करतो. देव खूपच दयावा असतो. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून इच्छापूर्ती करत असतो. मी देवाचा आशीर्वाद मानतो, की त्यांनी विरोधकांना अविश्वास प्रस्ताव मांडण्याची बुद्धी दिली. 2018 मध्ये देवाने असंच काहीसं केलं होतं. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. हा प्रस्ताव आमची परीक्षा नाही तर विरोधकांची परीक्षा आहे. या प्रकारचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो. झालंही तसंच”
“जेव्हा मतदान झालं तेव्हा विरोधकांकडे तितकी मतं होती तितकीही त्यांना पडली नाही. इतकंच नाही तर आम्ही जनतेत गेलो तेव्हा एनडीएला सर्वाधिक मतं पडली आणि सत्तेत आलो. एकप्रकारे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो.”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
2024 लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, “आज मी बघत आहे की, एनडीए आणि भाजपा 2024 मध्ये निवडणुकीत सर्व विक्रम मोडीत काढे. भव्य विजयासह आणि जनतेच्या आशीर्वादने पुन्हा सत्तेत येऊ”
“मी विरोधकांना एकच सांगेल की तुम्ही तायरी करून का येत नाहीत. थोडी मेहनत घ्या. 2018 मध्ये मी सांगितलं होतं की तयारी करून या. काय परिस्थिती आहे तुमची. हे विसरू नका की देश तुम्हाला बघत आहे. तुमचा एक एक शब्द देश ऐकत आहे. तुम्ही प्रत्येक वेळी देशाला निराश करण्याव्यतिरिक्त काहीच केलं नाही. विरोधकांची वहीखातं खराब झालं असताना आमच्याकडून हिशेब मागितला जात आहे.”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.