पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनचा अजेंडाच बदलला, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे प्रतिपादन

दिल्लीत सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने हा महोत्सव आयोजित केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले असून आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी सुशासन म्हणजे गुड गव्हनर्न्सची उदाहरणे देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनाची सारी परिभाषाच बदलल्याचे स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनचा अजेंडाच बदलला, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे प्रतिपादन
J.P. naddaImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 7:03 PM

नवी दिल्ली | 9 फेब्रुवारी 2024 : ‘सुशासन’ केवळ घोषणा नाही. त्यास जीवनात प्रत्यक्षात उतरविण्याची गरज आहे.सर्वसाधारणपणे लोक सुशासन हे केवळ स्लोगन बनवितात. परंतू लोकांना त्याऊपर यासाठी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज येथे केले. दिल्लीत ‘सुशासन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बोलताना ते पुढे म्हणाले की ज्यांना गुड गव्हर्नन्स हवे, त्यांनी आधी या मिशनसाठी समर्पित होऊन काम केले पाहीजेत सुशासन जीवनात उतरवूनच सुखी होऊ शकतो असेही ते म्हणाले. आपल्याकडे गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्स अशी दोन्ही उदाहरणे आहेत. मला दहा वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे. गुड गव्हर्नन्ससाठी कमिटमेंट पाहीजे. याशिवाय ते शक्य नाही. आपल्याकडे म्हण आहे की जर भंडाऱ्यावर भंडाऱ्यानेच हात मारला तर काय होणार, कुंपणच शेत खायला लागले तर काय करणार ? असा दाखला देत काय टाळायला हवे ते जे.पी.नड्डा यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधानांनी देशाची राजनीती बदलली

पंतप्रधानांनी देशाची राजकारणाची संस्कृतीच बदलून टाकली. त्यांनी सुशासनाचा अजेंडाच बदलून टाकला. त्यांनी हे सिद्ध केले की जर तुम्ही स्रिया, युवक, शेतकरी आणि गरीब यांची चिंता करीत असाल तर तुम्ही सर्व समाजाची चिंता करीत आहात. हेच सबका साथ, सबका विकास आहे अशा शब्दात जे.पी.नड्डा यांनी पंतप्रधानांचे कौतूक केले आहे.

आपल्या उद्धाटनपर भाषणात जेपी नड्डा यांनी म्हटले की विकासासाठी डिलिव्हरी आणि लीकेज वर काम केले पाहीजे. सरकारच्या प्रत्येक कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचल्या पाहीजेत. त्यासाठी प्रयत्न हवेत. पंतप्रधानांनी ज्या प्रकारची हेल्थ पॉलीसी देशाला दिली आहे. त्याने प्रत्येक नागरीकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न झाला. आज सर्वांना ही आपल्या गरजेची आरोग्य योजना आहे असे जे.पी.नड्डा यांनी सांगितले.

‘आयुष्यान भारत’ सुशासनाचे प्रतिक

आयुष्यमान भारत ही योजना लोकांमध्ये आरोग्य विमा म्हणून प्रसिद्ध झाली. यासाठी पंतप्रधानांनी आम्हाला टार्गेट दिले होते. हेच गुड गव्हर्नन्सचे उदाहरण आहे. छत्तीसगढचा मजूर जर तामिळनाडूत उपचार करतो तर त्याला तेथेच पैस मिळतात. कोरोनात 25 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. लोकांना जनधन खात्याचा फायदा मिळाला. आधी एका लायसन्ससाठी लोकांना घाम गाळावा लागायचा आज होम डिलिव्हरी होत असल्याचे जेपी नड्डा यांनी सांगितले.

आरोग्या सारखेच आज देशाच्या शैक्षणिक धोरणात मोठा बदल झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रात मोदी सरकारला सर्वांना एका जागी आणण्याचे धोरण आहे. उज्ज्वला, उजाला, सौभाग्य योजना, जल जीवन मिशनचा फायदा सर्वसामान्यांना मिळत आहे. आज डोंगरात राहणाऱ्यांनाही पाणी मिळत आहे. लोकांचे जीवन सुसह्य झाले आहे. लोक युपीआयचा सहज वापर करीत आहेत. सर्वांना पुरेशी वीज मिळत आहे. चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा लाभ मिळत आहे. हायवे तयार झाल्याने प्रवासाची बचत होत आहे. हेच गुड गव्हर्नन्सचे मॉडेल असल्याचेही नड्डा यांनी आपल्या भाषणात सांगितले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.