देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

रेल्वे प्रवास सुखकारक आणि आरामदायी होण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करीत आहे. ट्रेन,रेल्वे स्थानक तसेच रेल्वे स्थानक परिसरातील सुविधा सरकार वाढवित आहे.

देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
Prime Minister Narendra Modi
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 8:38 PM

नवी दिल्ली | 6 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात देशातील 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या पायाभरणीचा शुभारंभ रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला. या योजनेसाठी तब्बल 24 हजार 470 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या स्थानकांमध्ये प्रवाशांना अनेक सोयी सुविधा देण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचील 44 स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या एकूण 75  रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असून त्यात मुंबईतील 15 उपनगरीय रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. 25 हजार कोटी रुपयांच्या रेल्वे स्थानक पुनर्विकास योजनेतून रेल्वे स्थानकांच्या पायाभूत रचनेत क्रांतीकारी बदल केले जातील. रेल्वेद्वारे विकास या संकल्पनेतून सरकारने गेल्या नऊ वर्षांत साऊथ आफ्रीका, युक्रेन, पोलंड आणि स्वीडन एवढे रेल्वे नेटवर्क वाढविल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

स्थानके ‘हार्ट ऑफ दी सिटी’ बनली

रेल्वे प्रवास सुखकारक आणि आरामदायी होण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करीत आहे. ट्रेन,रेल्वे स्थानक तसेच रेल्वे स्थानक परिसरातील सुविधा सरकार वाढवित आहे. स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधांमुळे युवकांना फायदा होत आहे. बदलत्या काळानूसार रेल्वे स्थानके हार्ट ऑफ दी सिटी बनली आहेत. देशी आणि विदेशी व्यक्ती ट्रेनमधून प्रवास करेल त्यांना या सुविधांपाहून त्यांचे देशाबद्दलचे मत बदलून जाईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं ट्वीट पाहा –

अमृत भारत स्थानक योजनेत मध्य रेल्वेच्या 76  स्थानकांचा कायापालट

मुंबई विभाग – भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, इगतपुरी, वडाळा रोड, सँडहर्स्ट रोड

पुणे विभाग -कोल्हापूर, हडपसर, चिंचवड, सातारा, सांगली, कराड, तळेगाव, हातकणंगले, आकुर्डी, बारामती, देहूरोड, केडगाव, उरुळी, लोणंद, वाठार, फलटण

नागपूर विभाग – बल्हारशाह, बैतूल, चंद्रपूर, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, अमला, नरखेल, काटोल, पांढुर्णा, जुन्नरदेव, हिंगणघाट, मुलताई, घोराडोंगरी, गोधनी

भुसावळ विभाग – बडनेरा, मलकापूर, मूर्तिजापूर, नेपानगर, शेगाव, देवळाली, मनमाड, नांदुरा, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, धुळे, लासलगाव, रावेर, सावदा

सोलापूर विभाग – सोलापूर, कलबुर्गी, दौंड, पंढरपूर, वाडी, कुर्डुवाडी, अहमदनगर, कोपरगाव, लातूर, शहाबाद, बेलापूर, गंगापूर रोड, दुधनी, उस्मानाबाद, जेऊर

कोणत्या राज्यातील किती स्थानकांचा विकास

उत्तर प्रदेश- 55, राजस्थान- 55, बिहार- 49, महाराष्ट्र- 44, प. बंगाल- 37, मध्य प्रदेश- 34, असम- 32, ओडिशा- 25, पंजाब- 22, गुजरात- 21, तेलंगाना- 21, झारखंड- 20, आंध्र प्रदेश- 18, तामिलनाडु- 18, हरियाणा- 15, कर्नाटक- 13, केरळ- 5, त्रिपुरा- 3, जम्मू कश्मीर- 3, उत्तराखंड- 3, हिमाचल- 1, मेघालय- 1, नागालॅंड- 1, पुदुचेरी- 1, चंडीगड – 8

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.