म्युच्युअल फंडमध्ये 2004 ला 9 लाख कोटी, आता 2024 मध्ये…. PM नरेंद्र मोदींनी जाहीर केला आकडा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या दुसऱ्या पर्वामध्ये आले होते. यावेळी मोदी यांनी संबोधित करताना भाजप सरकारने गेल्या दहा वर्षांच्या काळात लोकांचा त्यांच्यावर किती विश्वास आहे, याचं उदाहरण देताना म्युच्युअल फंडमध्ये आता लोकांनी किती पैसे गुंतवलेत याची आकडेवारी जाहीरपणे सांगितली.

म्युच्युअल फंडमध्ये 2004 ला 9 लाख कोटी, आता 2024 मध्ये.... PM नरेंद्र मोदींनी जाहीर केला आकडा
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 9:29 PM

नवी दिल्ली |  TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या दुसऱ्या पर्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. मोदी यांनी यावेळी केलेल्या भाषणामध्ये भाजप सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली कामे सांगत असताना विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार टीका केली. भारत देश जगातील इतर देशांच्या तुलनेमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती करत असल्याचं मोदी म्हणाले. इतकंच नाहीतर देशातील लोकंही आता सरकारवर विश्वास ठेवत असल्याचं सांगताना मोदी यांनी म्युच्युअल फंडमध्ये लोकांनी केलेल्या गुंतवणूकीचा आकडा जाहीरपणे सांगितला.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

जेव्हा अनेकांचं प्रिडिक्शन चुकतं त्यापेक्षाव अधिक आम्ही काम करून दाखवलं आहे. माइंडसेट आणि ट्रस्टमधील परिवर्तनाचं कारण म्हणजे आमच्या सरकारचं वर्क कल्चर आहे. तेच अधिकारी आहे, तेच ऑफिस आहे, त्याच फायली आहे, तीच व्यवस्था आहे. पण रिजल्ट वेगळा येत आहे. सरकारचे कार्यालय देशवासियांचे सहयोगी बनत आहे. पूर्वी भारत रिव्हर्स गिअरमध्ये होता. भारताच्या विकासाला गती देण्यासाठी मोठी झेप घेण्यासाठी, ज्या गिअरवर भारत चालत होता, तो गिअर बदलली पाहिज असं आम्ही ठरवल्याचं मोदी यांना सांगितलं.

2014 मध्ये देशात लोकांनी 9 लाख कोटी रुपये म्युच्युअल फंडमध्ये ठेवले होते. आज 2204 मध्ये 52 लाख कोटींहून अधिक रुपये म्युच्युअल फंडात गुंतवले आहेत. देश मजबुतीने पुढे जात आहे हा विश्वास असल्याने गुंतवणूक वाढली आहे. माझ्यासाठी काहीच अशक्य नाही असं सर्वांना वाटत आहे. मी काहीही करू शकत आहे, असंही त्यांना वाटत असल्याचं मोदी म्हणाले.

दरम्यान, मी आमच्या सरकारची काही उदाहरणे देतो. मुंबईचा अटल सेतू देशातील सर्वात मोठा सी ब्रीज. त्याचा शिलान्यास 2016 मध्ये झाला. त्याचं उद्घाटन केलं. संसदेची नवी इमारत तयार केली. जम्मू एम्स तयार केलं. राजकोट एम ही पूर्ण केलं. त्रिची एअरपोर्टचंही लोकार्पण झालं. आयआयटी भिलाईचा शिलान्यास झाला आणि लोकार्पण केलं. गोव्याच्या नव्या विमानतळाचं लोकार्पण केलं. लक्षद्वीपमध्ये ऑप्टिकल फायबर बसवले, हे काम कठीण होतं. काही आठवड्यापूर्वीच आम्ही पूर्ण केल्याचं मोदींनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.