आणीबाणीचा कलंक काँग्रेसच्या कपाळावरून पुसला जाणार नाही; नरेंद्र मोदींचा जोरदार हल्ला

लोकसभेत बोलताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आणीबाणीचा कलंक काँग्रेसच्या कपाळावरून पुसला जाणार नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

आणीबाणीचा कलंक काँग्रेसच्या कपाळावरून पुसला जाणार नाही; नरेंद्र मोदींचा जोरदार हल्ला
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 6:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  त्यांनी आणीबाणीवरून पुन्हा एकदा काँग्रेसला कोंडीत पकडलं. देश जेव्हा  संविधानाचं 25 वं वर्ष साजरा करत होता, तेव्हा यांनी आणीबाणी आणली, नागरिकांचे अधिकार हिसकावून घेतले. प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हिरावलं, काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच पुसलं जाणार नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले मोदी? 

देश जेव्हा  संविधानाचं 25 वं वर्ष साजरा करत होता, तेव्हा यांनी आणीबाणी आणली, नागरिकांचे अधिकार हिसकावून घेतले. प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हिरावलं, लोकांना तुरुंगात टाकलं, देशाला तुरुंगखाना बनवलं. काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच पुसलं जाणार नाही. जगात जेव्हा जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा तेव्हा काँग्रेसच्या कपाळावरील पापाची चर्चा होईल, लोकशाहीला पायदळी तुडवण्याचं काम तेव्हा काँग्रेसन केलं असं मोदी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, संविधानाच्या ५०व्या वर्षी वाजपेयींनी हा दिवस साजरा केला होता. संविधानावर चर्चा घडवून आणली होती. मलाही संविधानाच्या प्रक्रियेतूनच मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली होती. मी मुख्यमंत्री असताना संविधानाला ६० वर्ष झाले होते. तेव्हा संविधानाचा ६० वा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आम्ही संविधानाची प्रत हत्तीवर ठेवून रॅली काढली, तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री संविधानाच्या खाली पायी चालत होता. आमच्यासाठी संविधानाचं मोठं महत्त्व आहे. आज संविधानाला ७५ वर्ष होत आहेत. मला त्यावर बोलण्याची संधी मिळाली आहे.

चढ उतार आले, पण देशातील जनता संविधानाच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली. काही तथ्य मला सांगायचे आहेत. काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानावर घाला घालण्यात कोणताही कसूर ठेवली नाही. मी एका कुटुंबाचा हा उल्लेख यासाठी करतो की 75 वर्षांपैकी एकाच कुटुंबाने 55 वर्ष राज्य केलं. त्यामुळे देशात काय काय झालं? हे माहीत करून घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे. या कुटुंबाचे कुविचार, कुनिती, कुरिती याची परंपरा निरंतर सुरू आहे, अशी टीकाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.