पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये राजकीय इतिहासातील सर्वात मोठी रॅली करणार, काय आहे भाजपला प्लॅन?
पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपकडून मोठी व्यूहरचना आखली जात आहे. त्याचाच भाग म्हणून भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालच्या इतिहासातील सर्वात मोठी रॅली काढणार आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय हालचाली घडताना पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपकडून मोठी व्यूहरचना आखली जात आहे. त्याचाच भाग म्हणून भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालच्या इतिहासातील सर्वात मोठी रॅली काढणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही मेगा रॅली होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.(PM Narendra Modi will hold a big rally in West Bengal)
कोलकातामधील सर्वात मोठं मैदान असलेल्या ब्रिगेड मैदानात ही रॅली होणार आहे. या रॅलीसाठी जवळपास 15 लाख लोक जमवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. 5 किंवा 7 मार्चला ही रॅली करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. दरम्यान पश्चिम बंगाल भाजपकडून रॅलीसाठी सध्या कुठलीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. दरम्यान, याबाबत अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 7 फेब्रुवारीला पश्चिम बंगालच्या एक दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. हल्दिया इथं पेट्रोलियम मंत्रालयाच्या कार्यक्रमात हे सहभागी होणार आहेत. इल्दिया इथं ते अनेक योजनांचं उद्घाटन करणार आहेत. या सोहळ्यात पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिली व्हिक्टोरिया मेमोरियल इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित राहिल्या होत्या. मात्र, तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी जय श्रीरामाच्या घोषणा दिल्यामुळे ममता बॅनर्जी यांना राग अनावर झाला होता आणि त्यांनी भाषण करण्यास नकार दिला होता. या मुद्द्यावरुन आता पश्चिम बंगालमध्ये जोरदार राजकारण सुरु आहे.
पंतप्रधान कोणत्या योजनांचं उद्घाटन करणार?
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 फेब्रुवारीला हल्दिया इथं जाणार आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत बंगालमध्ये जवळपास 8 लाख 85 हजार एलपीजी कनेक्शन्स देण्यात आले आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने हल्दिया इथं एलपीजी कॉर्पोरेशन बनवलं आहे. पंतप्रधान या कॉर्पोरेशनला देशाला समर्पित करणार आहेत, अशी माहिती प्रधान यांनी दिली आहे.
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्दिया रिफायनरीमधील लुब्रिकेन्ट्स बेस्ड ऑईलच्या कारखान्याचंही उद्घाटन करतील. 1 हजार 100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हल्दिया इथं एक LPG टर्मिनल उभारण्यात आला आहे.
आंदोलन शेतकऱ्यांचं मग का भांडतायत हॉलीवूड Vs बॉलीवूड?https://t.co/kKXR5CKuEv#FarmersProtest | #RihannaSupportsIndianFarmers | #AkshayKumar | #AjayDevgn | #SwaraBhasker | #KanganaRanaut
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 3, 2021
संबंधित बातम्या :
भाजप आमच्या भ्रष्टाचारी नेत्यांना विकत घेऊ शकते, निष्ठावंतांना नाही: ममता बॅनर्जी
ममतादीदींना झटका, आणखी एक आमदार भाजपमध्ये; आतापर्यंत 11 नेत्यांची टीएमसीला सोडचिठ्ठी
PM Narendra Modi will hold a big rally in West Bengal