जगातील सर्वात मोठा अभियंता कोण?, माहिती आहे का?
एक वेळ भगवान शिव माता पार्वतीला घेऊन वैकुंटाला गेले. तेथील सुंदरात पाहून माता पार्वती मंत्रमुग्ध झाली. कैलासात परतल्यानंतर माता पार्वतीने सुंदर महालाची इच्छा व्यक्त केली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना जाहीर केली. विश्वकर्मा जयंतीला १३ ते १५ कोटी रुपयांच्या योजनेची सुरुवात केली. याचा लाभ पारंपरिक कौशल्य, सुनार, चर्मकार, न्हावी आणि लोहार यांना मिळेल. ही योजना भगवान विश्वकर्मा यांच्या नावाने ठेवण्यात आली. विश्वकर्मा यांना सर्वात मोठा अभियंता मानले जाते. सोन्याची लंका आणि द्वारका नगरीची निर्मिती भगवान विश्वकर्मा यांनी केली, असे मानले जाते. विश्वकर्मा यांनी देवतांसाठी महल, हत्यारे आणि इमारतींचे बांधकाम केले होते. त्यामुळे विश्वकर्मा जयंतीला औजारे, मशीन्स, हत्यार आणि लोखंडाच्या वस्तूंचे पूजन केले जाते. विश्वकर्मा हे सृष्टीचे रचनाकार ब्रम्हा यांचे सातवे पुत्र होते.
इंद्राच्या वज्राची निर्मिती
भगवान विश्वकर्मा यांना निर्माणाची देवता मानले जाते. कारण देवांसाठी शानदार महल, इमारती, हत्यारं, सिंहासन तयार केले. देवासूर संग्रामात महर्षी दधीची यांनी हड्ड्यांचे वज्र बनवण्याचे काम विश्वकर्मा यांना दिले होते. हे वज्र इंद्रदेवता परिधान करत होते. वज्रामध्ये इतकी शक्ती होती की, दैत्यांचा नाश करत होती. रावणाची लंका तसेच पांडवांचे इंद्रप्रस्थ, कृष्णाची द्वारका विश्वकर्मा यांनी तयार केली होती.
अशी आहे सोन्याच्या लंकेची कहाणी
एक वेळ भगवान शिव माता पार्वतीला घेऊन वैकुंटाला गेले. तेथील सुंदरात पाहून माता पार्वती मंत्रमुग्ध झाली. कैलासात परतल्यानंतर माता पार्वतीने सुंदर महालाची इच्छा व्यक्त केली. भगवान शिव यांच्या आदेशावरून विश्वकर्मा आणि कुबेर यांनी सोन्याची लंका तयार केली. पौराणिक माहितीनुसार, रावणाने भगवान शिव यांना भीक्षेच्या रूपात लंका मागितली. तेव्हा शंकराने रावणाला लंका दिली.
विश्वकर्मा यांना बनवली होती द्वारका नगरी
श्रीमद्भागवत गीतेनुसार, श्रीकृष्णाची नगरी द्वारकेची निर्मिती भगवान विश्वकर्मा यांनी केली. पौराणिक कथांमध्ये असेही सांगितले आहे की, यमपुरी, पांडवांची राजधानी हस्तीनापूर, कुबेरपुरी, वरुणपुरे यांची निर्मिती ही विश्वकर्मा यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी योजनेबाबत सांगितले. यात आर्थिक मदत, प्रशिक्षणाची आधुनिक पद्धतीची माहिती दिली.