Video : किती वर्ष झाले इकडे? काय इच्छा काय तुझी?; नरेंद्र मोदी कुवैतमध्ये मुस्लिम व्यक्तीशी चक्क मराठीत बोलतात तेव्हा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कुवैत दौऱ्यामध्ये एका मुस्लिम व्यक्तीशी चक्क मराठीमध्ये संवाद साधला आहे. याचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या कुवैत दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवैत दौरा खास होता. कारण 43 वर्षानंतर कुवैत दौऱ्यावर जाणारे पंतप्रधान मोदी पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी फक्त इंदिरा गांधी यांनी कुवैतचा दैरा केला होता. कुवैत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवैतचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ देऊन सन्मानित करण्यात आलं. कुवैतचे अमीर शेख मीशाल अल-अहमद अल-जाबीर अल-साबह यांनी पंतप्रधान मोदींना या पुरस्कराने सन्मानित केलं.
दरम्यान याच दौऱ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका कुवैतमध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रीयन मुस्लिम व्यक्तीशी मराठीमध्ये संवाद साधत आहेत.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्यक्तीला मराठीमधून प्रश्न विचारत आहेत की किती वर्ष झाले तुम्ही इकडे काम करतात, तेव्हा तो व्यक्ती म्हणतो नऊ वर्ष झाली. त्यानंतर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्यक्तीला प्रश्न करतात की मग आणखी काय विशेष तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की काही नाही, मी माझ्या एका मुलीला शिकवून तिचं लग्न केलं. तेव्हा पंतप्रधान मोदी पुन्हा त्याला प्रश्न करतात की कुठे लग्न केलं तेव्हा तो म्हणतो तिकडे गावी रत्नागिरीमध्ये
View this post on Instagram
त्यानंतर पुन्हा मोदी त्याला विचारतात मग आता तुझी इच्छा काय आहे, तु पुढे काय करणार आहेस. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की आता मी माझ्या एका मुलीचं लग्न केलं आहे, तिच्या जबाबदारीमधून मोकळ झालो आहे. आता मी माझ्या मुलांना खूप शिकवणार आहे. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणतात की,’ शिकव खूप चांगला विचार केला आहेस तू. प्रत्येकानं आयुष्यात एक गोष्टी निश्चित करायला पाहिजे की आयुष्यात काहीही झालं तरी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. थोडा त्रास होईल पण मुलांना चांगलं शिक्षण मिळायला हवं, असं मोदींंनी म्हटलं आहे.