PM Modi America Visit : पंतप्रधान मोदी यांना पहिल्यांदा २१ तोफांची सलामी देणार अमेरिका, दौऱ्याचा पूर्ण खर्चही करणार
बायडेन आणि फर्स्ट लेडी मिसेस बायडेन यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. शिवाय राजकीय जेवणाचं आयोजनही करण्यात आलंय. पंतप्रधान मोदी यावेळी अमेरिका काँग्रेसला संबोधित करणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २४ जूनपर्यंत अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा विशेष राहणार आहे. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी यांना २१ तोफांची सलामी देण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रपती जो. बायडेन आणि फर्स्ट लेडी मिसेस बायडेन यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. शिवाय राजकीय जेवणाचं आयोजनही करण्यात आलंय. पंतप्रधान मोदी यावेळी अमेरिका काँग्रेसला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ पासून आतापर्यंत सात वेळा अमेरिकेला गेले आहेत. यावेळचा अमेरिकेचा दौरा खास आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना आमंत्रित केले. यापूर्वी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले होते किंवा शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी गेले होते. राजकीय दौरे कसे होतात आणि या दौरा कसा वेगळा आहे.
कसा असतो राजकीय दौरा
देशाच्या प्रमुखांना आपल्या देशात येण्यासाठी राजकीय आमंत्रण दिले जाते त्याला राजकीय दौरा म्हणतात. पंतप्रधान मोदी यांना या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि प्रथम महिला जील बायडेन यांनी आमंत्रण दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फारच कमी लोकांना स्वतः निमंत्रण देतात.
पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम कसा आहे?
पंतप्रधान मोदी २१ जूनला संध्याकाळी अमेरिकेला पोहचणार आहेत. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत होईल. २२ जूनला ते व्हाईट हाऊसला जातील. तिथं त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. याशिवाय काही स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांच्यात औपचारिक चर्चा होईल. दोन्ही देशाचे प्रमुख भेटवस्तूंचे आदानप्रदान करतील.
आतापर्यंत भारताला तीन वेळा मिळाले आमंत्रण
पंतप्रधान मोदी यांना पहिल्यांदा राजकीय दौऱ्याचे निमंत्रण मिळाले. यापूर्वी २००९ मध्ये डॉ. मनमोहन सिंह यांना, तर १९६३ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना राजकीय दौऱ्याचे निमंत्रण मिळाले होते.