पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका, योगीजी, राजीनामा द्या: प्रियांका गांधी

पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करुन जबाबदारी झटकू नये, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रियांका गांधींनी केली. (Priyanka Gandhi demands resignation of Yogi Aadityanath)

पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका, योगीजी, राजीनामा द्या: प्रियांका गांधी
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 11:41 PM

नवी दिल्ली: एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर योगी सरकारने हाथरसचे एसपी, डीएसपी आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यूपी सरकारच्या या कारवाई वर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी टीका केलीय. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचे फोन कॉल रेकॉर्ड सार्वजनिक करा.  पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करुन जबाबदारी झटकू नये, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रियांका गांधींनी केली. (Priyanka Gandhi demands resignation of Yogi Aadityanath)

“योगी आदित्यनाथ जी काही मोहऱ्यांना निलंबित करुन काय होणार आहे? हाथरसची पीडिता, तिच्या कुटुंबाला भयानक परिस्थितीला कुणाच्या आदेशावरून सामोरे जावे लागले?, हाथरसचे जिल्हाधिकारी एसपी यांचे फोन कॉलवरील संभाषण सार्वजनिक करा.मुख्यमंत्रीजी तुम्ही तुमच्या जबाबदारीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करु नये. देश आपल्याला बघत आहे, तुम्ही राजीनामा द्या.”, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली.

हाथरसचे जिल्हा पोलीस प्रमुख विक्रांत वीर , पोलीस उपअधीक्षक तसंच पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना योगी सरकारने निलंबित केलं आहे. त्यांची नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. तसंच हाथरस पोलीस स्थानकातील सगळ्या पोलिसांची नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. पीडितेच्या कुटुंबाची देखील नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.

दरम्यान, हाथरस प्रकरणावरुन देशभरात संताप व्यक करण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओ ब्रायन पीडितेच्या गावाकडे निघाले असता त्यांना देखील पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गुरुवारी पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना यूपी पोलिसांनी त्यांना अडवत अटक केली होती.

संबंधित बातम्या:

प्रचंड दबावानंतर योगी सरकारची कारवाई, हाथरसचे SP, DSP यांच्यासह बडे अधिकारी निलंबित

योगीजी, माध्यमांसह राजकीय नेत्यांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू द्या, उमा भारतींची विनंती

Priyanka Gandhi demands resignation of Yogi Aadityanath

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.