नवी दिल्ली : दिशा रवी या बावीस वर्षांच्या मुलीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे. दिशा रवी ही मुलगी ‘फ्रायडेज फॉर फ्युचर इंडिया’ नावाची संस्था चालवते जी ग्रेटा थनबर्गच्या ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ या पर्यावरणवादी संघटनेशी संलग्न आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेचे आसूड ओढायला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी एका निशस्त्र कार्यकर्तीला बंदुकीवाले घाबरत आहेत, अशी टीका केली आहे.
डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से… फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी दिशा रवीच्या अटकेचा निषेध केला आहे. तसंच या अटकेचा निषेध व्यक्त करताना त्यांनी सरकारवर तोफ डागली आहे.
डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से
फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से#ReleaseDishaRavi #DishaRavi#IndiaBeingSilenced— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 15, 2021
ग्रेटा थनबर्गला शेतकरी आंदोलना संदर्भात माहिती, डॉक्युमेंट, कृती आराखडे देणारे ‘टूलकीट’ पुरवले म्हणून देशद्रोहाचा ठपका ठेवून तिला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या टूलकिट तपासाच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांनी शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी लोकांची नेमकी काय भूमिका आहे याचा तपास सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिशा रवीला पाच दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये ठेवण्यात येणार आहे.
दिशा रवी ही पर्यावरणवादी कार्यकर्ती, समाजसेवक आहे. फ्राइडेज फॉर फ्यूचर इंडिया नावाच्या संस्थेची ती संस्थापक आहे. जलवायू संदर्भात जनजागृती करण्याचं काम ती करते. ती बेंगळुरूची रहिवासी असून एका खासगी महाविद्यालयातून तिने बीबीए केलंय. सध्या ती गुड वेगन मिल्क नावाच्या संस्थेत काम करते.
प्लान्ट बेस्ड फूड अधिक स्वस्त आणि सुलभ बनविण्याचं काम ही संस्था करते. गाय, म्हशींसह प्राण्यांवर आधारीत कृषी पद्धत संपुष्टात आणून प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार द्यावा, अशा मताची दिशा रवी आहे.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी तयार करण्यात आलेल्या टुलकिट दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे. पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गने हेच टुलकिट दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केले होते. भारतात द्वेष निर्माण करण्यासाठी दिशाने खलिस्तान समर्थक ग्रुप पोएटिक जस्टिस फाऊंडेशनशी हात मिळवणी केल्याचाही तिच्यावर आरोप आहे. ही टुलकिट संपादित करणाऱ्यांपैकी दिशा एक असल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केला आहे.
हे ही वाचा :