नवी दिल्ली : भारतीय रेल्वेनं आपल्या पहिल्या AC थ्री टियर इकॉनॉमी क्लास कोटची सुरुवात केली आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ही माहिती दिली आहे. या नव्या AC थ्री टीयर इकॉनॉमी कोचची निर्मिती पंजाबमधील कपूरथला इथल्या कोच फॅक्टरीमध्ये केली जात आहे. भारतीय रेल्वेचा हा नवा कोच सर्वात स्वस्त आणि वातानुकूलित यात्रेसाठी चांगला पर्याय असल्याचं भारतीय रेल्वेकडून सांगितलं जात आहे. हा कोच किफायतशीर आणि सध्याच्या Non AC स्लीपर क्लास कोच आणि AC थ्री टियर कोचच्या मध्ये असणार आहे.(Production of new AC three tier coaches by Indian Railways)
या लिंके हॉफमॅन बुश कोचला आगामी ट्रायलसाठी रोल आऊट करण्यात आलं आहे. कपूरथला इथल्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड ऑर्गनाझेशन लखनऊमध्ये करण्यात आलं आहे. या कोचची कल्पना RCF कडून करण्यात आली होती आणि ऑक्टोबर 2020 मध्ये या कोचची डिझाईन सुरु झालं होतं.
Innovative AC 3 tier economy class coach manufactured in Rail Coach Factory, Kapurthala in Punjab.
⬆️ Passenger capacity increased with new design
⏹ Ergonomic ladder & luminescent aisle markers
⏺ Disabled-friendly toilet entry doors
Watch on Koo: https://t.co/U9BTZdgy47 pic.twitter.com/aMcfVmkscY
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 11, 2021
नव्या डिझाईनसह प्रवाशी श्रमता वाढली आहे.
एर्गोनॉमिक सिडी आणि न्यूमिनेसेंट आइजल मार्कर देण्यात आले आहेत.
दिव्यांगांसाठी अनुकूल शौचालय प्रवेश द्वार बनवण्यात आलं आहे.
नव्या AC थ्री टियर इकॉनॉमी क्लास कोचमध्ये अधिक प्रवासी प्रवास करु शकतात
या कोचमध्ये बर्थची संख्या 72 वरुन 83 करण्यात आली आहे.
नव्या AC थ्री टियर इकॉनॉमी क्लाच कोचच्या डिझाईनमध्ये अन्य इनोव्हेशनही करण्यात आले आहेत.
रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरचा स्वदेशी पर्याय असलेल्या Kooवर नव्या AC थ्री टियर इकॉनॉमी क्लास कोचचा व्हिडीओ जारी केला आहे. काही दिवसांपूर्वीच पियूष गोयल ट्विटरचा स्वदेशी पर्याय असलेल्या Koo शी जोडले गेले आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये Koo लॉन्च झालं होतं. Koo हे भारतीय भाषांमध्ये ट्विटरप्रमाणेच मायक्रोब्लॉगिंगचा अनुभव देतं.
संबंधित बातम्या :
Production of new AC three tier coaches by Indian Railways