अजब प्राध्यापकाची गजब कहाणी; लेक्चरला विद्यार्था नाहीत म्हणून 23 लाख रुपये पगार विद्यापीठाला केला परत
पगार परत करण्याविषयी त्यांनी आपली भूमिका सांगताना म्हणाले की, मी माझ्या अध्यापनात समाधानी नव्हतो. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचाराने जाणारा मीआहे, त्यामुळे स्वतःलाचा हे मान्य नव्हते,त्यामुळे नियुक्तीपासूनचा ते आतापर्यंतचा सगळा पगार त्यांनी विद्यापीठाला परत केला आहे.
नवी दिल्लीः बिहार राज्य (Bihar State) अनेकदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी तेथील गुन्हेगारी, तर कधी तेथील प्राथमिक शाळेतील शिक्षण व्यवस्थेमुळे. तर आता मात्र बिहार शिक्षण क्षेत्रातीलच गोष्टीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तेही एका प्राध्यापकामुळे. प्राध्यापकांच्या पगाराची चर्चा नेहमीच होत असते, त्यांचे लेक्चर आणि त्यांचे पगार याविषयीही अनेकदा चर्चा होते आताही त्याच गोष्टीमुळे बिहारमधील प्राध्यापक चर्चेत आला आहे ते म्हणजे त्या प्राध्यापकांनी एकाही विद्यार्थ्याला शिकवता आले नाही म्हणून आपला 23 लाख रुपये पगार चक्क विद्यापीठाला परत करून टाकला आहे. त्यामुळेच बिहारचे आणि मुजफ्फरपूर येथील बीआरए बिहार विद्यापीठातील (BRA University) त्या प्राध्यापकाचे नाव चर्चेत आले आहे.
प्रा. डॉ. ललन कुमार (Dr. Lalan Kumar) नितीश्वर महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विद्यापीठाला त्यांनी आपला पगार परत करताना त्यांनी म्हटले आहे की, आपल्या तासाला विद्यार्थ्यांची उपस्थिती नेहमीच शून्य असते, त्यामुळे त्यांनी 2 वर्षे, 9 महिन्यांचा संपूर्ण पगारच परत केला आहे, आणि ही रक्कम 23 लाख 82 हजार 228 रुपये इतकी.
पगार परत घ्या नाही तर नोकरी सोडतो
डॉ. ललन कुमार यांनी मंगळवारी आपला चेक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आर. के. ठाकूर यांच्याकडे दिला. तो चेक देताना तिथे उपस्थित असलेल्या व्यक्ती सांगतात की, कुलसचिवांनी त्यांचा चेक घेण्यास नकार दिला होतो पण, प्रा. कुमार यांनी आपण या निर्णयावर ठाम असून तुम्ही जर चेक स्वीकारला नाही तर मी नोकरी सोडण्याचा विचार करणार असंही त्यांनी सांगितले. त्यानंतर विद्यापीठानेही त्यांचा चेक स्वीकारला.
अध्यापनात समाधानी नव्हतो
पगार परत करण्याविषयी त्यांनी आपली भूमिका सांगताना म्हणाले की, मी माझ्या अध्यापनात समाधानी नव्हतो. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचाराने जाणारा मीआहे, त्यामुळे स्वतःलाचा हे मान्य नव्हते,त्यामुळे नियुक्तीपासूनचा ते आतापर्यंतचा सगळा पगार त्यांनी विद्यापीठाला परत केला आहे.
ललन कुमार हे सर्वसामान्य कुटुंबातील
बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील रहिवासी असलेले डॉ. ललन कुमार हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे बारावीपर्यंतचं शिक्षण बिहारमधून घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं, आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पीएचडी पूर्ण केले. विद्यापीठाचे त्यांना सुवर्णपदकही मिळाले आहे. त्यानंतर डॉ. ललन कुमार यांची नियुक्ती बिहार विद्यापीठात 24 सप्टेंबर 2019 मध्ये झाली होती.
शैक्षणिक कारकिर्द संपुष्टात येईल
ते पगाराविषयी बोलताना सांगतात की, शिक्षक अशा प्रकारे पगार घेत राहतील, तर पाच वर्षांत त्यांची शैक्षणिक कारकिर्द संपुष्टात येईल. ही कारकिर्द पुढे जावी, असं वाटत असेल तर शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होत राहिली पाहिजे. त्यांची विद्यापीठात नियुक्ती झाल्यापासून कॉलेजात शिक्षणाचे वातावरण दिसून आले नाही.
विद्यार्थ्यांची संख्या अकराशे
हिंदी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1100 च्या जवळपास आहे.मात्र डॉ. ललन कुमार यांच्या तासिकेला जवळपास शून्य उपस्थिती होती. त्यामुळे शैक्षणिक कार्य आपण पूर्ण करू शकले नाही, त्यामुळे ही गोष्ट माझ्या नैतिकतेत बसणारी नव्हती. त्यामुळे पगार परत केला आहे. त्यांनी कॉलेजची परिस्थिती बघून कुलसचिवांकडे अनेकदा आपल्या बदलीचीही मागणी केली होती, मात्र त्यांची बदली केली गेली नाही.