PRS Oberoi : ओबेरॉय ग्रुपचे अध्यक्ष पीआरएस ओबेरॉय यांचे निधन, असा होता त्यांचा जीवन प्रवास

PRS Oberoi Passes Away हॉटेल इंडस्ट्रीचं रूपडं पालटणारे पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचे निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. कंपनीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. भगवंती ओबेरॉय चॅरिटेबल ट्रस्ट, ओबेरॉय फार्म, कापशेरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कंपनीने सांगितले की ओबेरॉय ग्रुपमधील किंवा पीआरएस ओबेरॉय यांना ओळखणारा कोणीही अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकतो.

PRS Oberoi : ओबेरॉय ग्रुपचे अध्यक्ष पीआरएस ओबेरॉय यांचे निधन, असा होता त्यांचा जीवन प्रवास
पीआएस ओबेरॉय Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 12:37 PM

नवी दिल्ली : ओबेरॉय ग्रुपचे मानद अध्यक्ष पृथ्वीराज सिंह ओबेरॉय (PRS Oberoi) यांचे आज म्हणजेच मंगळवारी सकाळी निधन झाले. पीआरएस ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या व्यवसायाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांची ख्याती होती. ते 94 वर्षांचे होते. पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल उद्योगांचा चेहरामोहरा बदलून टाकला. PRS ओबेरॉय यांनी 2022 मध्ये EIH लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे अध्यक्षपद सोडले होते.

लक्झरी हॉटेल्स निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध

महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक लक्झरी हॉटेल्स उघडून आंतरराष्ट्रीय लक्झरी प्रवाशांसाठी ओबेरॉय हॉटेल्स नकाशावर ठेवण्याचे श्रेय पीआरएस ओबेरॉयला जाते.” “अनेक देशांमधील लक्झरी हॉटेल्सच्या व्यवस्थापनासाठी नेतृत्व प्रदान करण्याव्यतिरिक्त, ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सच्या विकासात PRS ओबेरॉयने प्रमुख भूमिका बजावली आहे, असे ओबेरॉय ग्रुप वेबसाइटवर नमुद करणयात आले आहे.

पीआरएस ओबेरॉय यांना जानेवारी 2008 मध्ये देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय लक्झरी ट्रॅव्हल मार्केट (ILTM) ने डिसेंबर 2012 मध्ये त्यांचे अपवादात्मक नेतृत्व, दूरदृष्टी आणि वाढीतील योगदानाबद्दल जागतिक स्तरावर त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. ओबेरॉय ग्रुप ही जगातील आघाडीच्या लक्झरी हॉटेल चेनपैकी एक आहे.

हे सुद्धा वाचा

सायंकाळी होणार अंत्यसंस्कार

कंपनीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. भगवंती ओबेरॉय चॅरिटेबल ट्रस्ट, ओबेरॉय फार्म, कापशेरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कंपनीने सांगितले की ओबेरॉय ग्रुपमधील किंवा पीआरएस ओबेरॉय यांना ओळखणारा कोणीही अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकतो. ग्रुपच्या सर्व हॉटेल्स आणि कॉर्पोरेट ऑफिसमध्येही त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.