PSI Recruitment Scam: ‘न्याय न मिळाल्यास अतिरेकी संघटनेत जाऊ’, मोदींना पोलीस भरती विद्यार्थ्यांचं रक्तानं माखलेलं पत्र

PSI Recruitment Scam : सरकारच्या निर्णयामुळे 54,289 विद्यार्थ्यांना पुन्हा नव्यानं परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.

PSI Recruitment Scam: 'न्याय न मिळाल्यास अतिरेकी संघटनेत जाऊ', मोदींना पोलीस भरती विद्यार्थ्यांचं रक्तानं माखलेलं पत्र
भरती घोटाळ्याचे गंभीर पडसादImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 12:56 PM

बंगळुरु : कर्नाटकात पीएसआय भरतीत (PSI Recruitment Scam) झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलंय. या भरती घोटाळ्याची कसून चौकशी (Investigation) करावी, यासाठी परीक्षेस बदलेल्या काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) पत्र लिहून मागणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्या रक्ताने विद्यार्थ्यांनी (Letter with Blood) हे पत्र लिहिलंय. इतकं काय तर, न्याय मिळाला नाही, तर अतिरेकी संघटनेत सामील होण्याची धमकी देखील या पत्राद्वारे देण्यात आलंय. हे पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. 545 पोलीस सब इन्स्पेक्टर पदासाठी भरती प्रकिया राबवण्यात आली होती. या भरतीप्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला. या भरतीप्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेवरच सवाल उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आणि याप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली होती.

तपासात काय समोर आलं?

दरम्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासातही खळबळजनक माहिती समोर आली आहे. परीक्षेदरम्यान काही शिक्षकांना शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी सहकार्य करावं, अशा प्रकारे आदेश देण्यात आल्याचा दावा केला गेलाय. कलबुर्गीमधील एका खासगी शाळेतील शिक्षकांच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे. सीआयडी सध्या याप्रकरणी तपास करतेय.

गेल्याच आठवड्यात डीव्हायएसपी शांता कुमार यांना ताब्यात घेतण्यात आलं होतं. कथिक सबइन्स्पेक्टर पोलीस भरती घोटाळ्यात त्यांचा हात असल्याच्या संशयावरुन त्यांना ताब्यात घेतलं गेलं होतं. या घोटाळा समोर आल्यानंतर कर्नाटक सरकारनं पीएसआय भरतीसाठी लागलेला निकाल रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नव्यानं परीक्षा घेण्यात येईल, असं सांगण्यात आलं. सरकारच्या या निर्णयामुळे 54,289 विद्यार्थ्यांना पुन्हा नव्यानं परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, आता विद्यार्थ्यांच्या एका गटानं मोदींनी रक्तानं पत्र लिहून देत न्याय मिळावा अशी मागणी करताना धमकावलंही आहे. न्याय मिळाला नाही, तर अतिरेकी संघटनेत सामील होऊ, अशा इशारा पत्रातून विद्यार्थ्यांनी दिलाय. त्यामुळे खळबळ उडालीय.

घोटाळा झाल्याचं कळलं कसं?

या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर हा घोटाळा झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. 100 टक्के मार्क मिळालेल्या काहीचे पेपर हे चक्रावून टाकणारे होते. अवघ्या 21 प्रश्नांची उत्तर दिलेल्यांना 100 टक्के मार्क मिळाल्यानं संशय बळावला होता. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. 55 जणांना आतापर्यंत या घोटाळ्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. 54 हजार विद्यार्थ्यी 545 पदांसाठी परीक्षेला सामोरं गेले होते. 75 ते 80 लाख रुपयांची लाच विद्यार्थ्यांकडून पोलीस भरतीसाठी घेण्यात आलाची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.