Puducherry : लक्ष्मी हत्तीणीच्या अकस्मात मृत्यूने भाविक हळहळले, पुडुचेरीवासीयांनी दिला साश्रू नयनांनी निरोप..
Puducherry : केंद्र शासित प्रदेश पुडुचेरीवर लाडक्या हत्तीणीच्या मृत्यूने दुखाचे सावट आहे..
पुडुचेरी : पुडुचेरीतील (Puducherry) नागरीकांवर दुखाचे संकट कोसळले आहे. सर्वात लाडक्या हत्तीणीचा (Elephant) मृत्यू ओढावल्याने पुडुचेरीवासीय दुखात बुडाले आहे. येथील प्रसिद्ध श्री मनकुला विनयगर मंदिरातील लक्ष्मी (Laxmi) या हत्तीणीचा हृदयविकाराच्या धक्क्याने अकस्मित मृत्यू ओढावला. शहरातील अनेकांना हत्तीणीसोबत लळा लागला होता. तिचा आशिर्वाद घेतल्याशिवाय अनेकांचे काम सुरु होत नव्हते. तिच्या अचानक जाण्याने भाविकांना आश्रू आवरता आले नाही. त्यांनी साश्रू नयनांनी तिला अखेरचा निरोप दिला.
बुधवारी नेहमीप्रमाणे लक्ष्मी सकाळी फिरायला बाहेर पडली. क्लेव्ह कॉलेजच्या (public secondary school Calve College) रस्त्यावर ती अचानक कोसळली. ती 32 वर्षांची होती. हृयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू ओढावल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
हत्तीणीच्या मृत्यूनंतर सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. पुडुचेरीचे नायब राज्यपाल तामिलसाई सुंदरराजन यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्यांनी संवेदना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. अनेकांनी त्यांच्या भावना समाज माध्यमावर व्यक्त केल्या.
Puducherry | A large number of people, including Lt Governor Tamilisai Soundararajan paid tributes to Lakshmi, the 32-year-old temple elephant of Sri Manakula Vinayagar Temple who passed away today
Lakshmi suddenly collapsed during a walk today on the temple road and passed away pic.twitter.com/XlIS3bnWby
— ANI (@ANI) November 30, 2022
लक्ष्मीच्या मृत्यूची वार्ता हा हा म्हणता, समाज माध्यमावर वाऱ्यासारखी पसरली. भाविकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काहींनी तिच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण केले. भाविकांना यावेळी हुंदका आवरता आला नाही. काही जण ओक्साबोक्शी रडू लागले.
तिच्या मृत्यूबाबत समाज माध्यमावर उलटसूलट चर्चा सुरु झाली. पण भाविकांना दररोज सोंडेद्वारे मायेचा आशिर्वाद देणारी लक्ष्मी अचानक निघून गेल्याने पुडुचेरीवासीय पोरके झाले. लक्ष्मीच्या अंत्ययात्रेत शेकडो भाविक उपस्थित होते. त्यांच्या डोळ्यातून आश्रू तरळत होते.
2020 मध्ये वर्षाच्या सुरुवातीला कोरोना आजाराच्या काळात लक्ष्मीला श्री मनकुला विनयगर या मंदिरातून काही महिने दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले होते. पण जनरेट्यापुढे प्रशासन नमले आणि त्यांनी पुन्हा लक्ष्मीला मंदिरात आणले. ही हत्तीण या मंदिराचे वैभव असल्याची भाविकांची श्रद्धा होती.