Puducherry Exit Poll result 2021 : पुद्दुचेरीतही मोदींचा करिष्मा, NDA ला सर्वाधिक जागा मिळण्याची चिन्हं

टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ( TV9-POLSTRAT Exit Poll Puducherry 2021) भाजपप्रणित NDA ला 17 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित युपीएला 11 ते 13 जागा मिळतील अशी शक्यता आहे. (Puducherry Exit Poll Results 2021 Elections LIVE Updates in marathi TV9-POLSTRAT exit poll result BJP Congress)

Puducherry Exit Poll result 2021 : पुद्दुचेरीतही मोदींचा करिष्मा, NDA ला सर्वाधिक जागा मिळण्याची चिन्हं
पुद्दुचेरीतही मोदींचा करिष्मा, NDA ला सर्वाधिक जागा मिळण्याची चिन्हं
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 7:21 PM

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या राज्यांतील महासंग्रामाकडे अवघ्या देशाचे जेवढे लक्ष लागले आहे, तितकेच महत्व पुद्दुचेरी सारख्या केंद्रशासित प्रदेशालाही आले आहे. इथल्या महासंग्रामात नेमकं कोण बाजी मारणार याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मागील दोन टर्म केंद्रातील सत्ता अबाधित राखलेल्या एनडीएलाच पुद्दुचेरीच्या गडावर आपला झेंडा फडकावता येणार असल्याचा टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या ठिकाणीही करिष्मा दिसून येणार असल्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आणि डीएमके आघाडीचे पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न भंगणार असल्याचे चित्र आहे. टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ( TV9-POLSTRAT Exit Poll Puducherry 2021) भाजपप्रणित NDA ला 17 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित युपीएला 11 ते 13 जागा मिळतील अशी शक्यता आहे. (Puducherry Exit Poll Results 2021 Elections LIVE Updates in marathi TV9-POLSTRAT exit poll result BJP Congress)

एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा

भाजपप्रणित NDA – 17 ते 19 जागा काँग्रेसप्रणित UPA – 11 ते 13 जागा एकूण – 30 जागा

पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात पार पडली निवडणूक

राष्ट्रपती राजवट असलेल्या पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात 6 एप्रिल 2021 रोजी निवडणूक पार पडली. एकाच टप्प्यात चार जिल्ह्यांतील 30 जागांसाठी मतदान पार पडले असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सध्या इथे भाजपने स्थानिक पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. पुद्दुचेरीच्या विधानसभेवर केंद्र सरकारकडून तीन सदस्यांची शिफारस केली जाते.

फेब्रुवारीत सरकार गडगडल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू

पुद्दुचेरीमध्ये निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी तिथले सरकार गडगडले होते. त्यानंतर तिथे राष्ट्रपती राजवट लागली होती. गेल्या 22 फेब्रुवारीला काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे संकटात आलेले पुद्दुचेरीतील काँग्रेस सरकार अखेर कोसळले. आमदारांनी साथ सोडल्याने मुख्यमंत्री व्ही. नारायण स्वामी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

2016 च्या निवडणुकीचे चित्र कसे होते?

2016 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला खातेही खोलता आले नव्हते. आता मात्र काँग्रेसचे ग्रह फिरले आहेत. सात आमदारांच्या राजीनाम्यामुळे गडगडलेले सरकार यावेळी पुन्हा सत्तेत येण्याची शक्यात धूसर आहे. 2016 मध्ये एआयएनआरसीला 8 जागा, एआयएडीएमकेला 4 जागा, तर डीएमकेला 2 जागांवर विजय मिळाला होता. (Puducherry Exit Poll Results 2021 Elections LIVE Updates in marathi TV9-POLSTRAT exit poll result BJP Congress)

इतर बातम्या

पोलिसांना धमकावल्याप्रकरणी फडणवीस, दरेकरांवर गुन्हा दाखल करा, एसआयटी नेमा; भाई जगताप यांची मागणी

MPL T20 | मुंबई प्रीमिअर लीग पुढे ढकलण्यास कोरोनाचे कारण, दडलंय वेगळंच राजकारण?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.