मोठी बातमी: पुदुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का; व्ही. नारायणसामींचे सरकार बहुमत चाचणीत अपयशी

| Updated on: Feb 22, 2021 | 11:57 AM

काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे हे सरकार पडणार, हे निश्चित होते. | Puducherry Floor Test

मोठी बातमी: पुदुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का; व्ही. नारायणसामींचे सरकार बहुमत चाचणीत अपयशी
काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे हे सरकार पडणार, हे निश्चित होते. त्यामुळे व्ही. नाराणसामी आणि काँग्रेसच्या आमदारांनी बहुमत चाचणीआधीच सभात्याग केला. तत्पूर्वी व्ही. नारायणसामी यांनी आपल्या शेवटच्या भाषणात काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर शरसंधान साधले.
Follow us on

पुद्दुचेरी: सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे अल्मपतात आलेले पुदुचेरीतील काँग्रेस सरकार अखेर कोसळले आहे. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी (V Narayanasamy) यांना सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे हे सरकार पडणार, हे निश्चित होते. त्यामुळे व्ही. नाराणसामी आणि काँग्रेसच्या आमदारांनी बहुमत चाचणीआधीच सभात्याग केला. तत्पूर्वी व्ही. नारायणसामी यांनी आपल्या शेवटच्या भाषणात काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर शरसंधान साधले. (Puducherry floor test Narayanasamy government fails to prove majority)

व्ही. नारायणसामी यांचे सरकार विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर पुदुचेरीची विधानसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. काँग्रसचे आमदार लक्ष्मीनारायण आणि डीएमकेचे आमदार वेंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यापूर्वी काँग्रेसच्या चार आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला होता. या दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे 33 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-डीएमके आघाडीच्या आमदारांची संख्या घटून 11 झाली आहे. तर विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या 14 झाली होती.

एप्रिल-मे दरम्यान विधानसभा निवडणूक

या सगळ्या उलथापलथीनंतरही मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी सरकार बहुमतात असल्याचा दावा केला होता. एप्रिल-मे महिन्यात पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक होत आहे. त्यापूर्वी तिथे मोठ्या राजकीय हालचाली होताना पाहायला मिळत आहेत. पुद्दुचेरी विधानसभेत काँग्रेसचे 10, DMK 3, ऑल इंडिया एन आर काँग्रेस 7, AIDMK 4, भाजप 3 तर 1 अपक्ष आमदार आहे. काँग्रेसच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर एक आमदार अपात्र ठरला होता. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा 15 आहे.

किरण बेदी यांना पदावरुन हटवले

काही दिवसांपूर्वीच भाजपच्या किरण बेदी यांची पुदुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. किरण बेदी यांच्या जागी तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. 10 फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राद्वारे उपराज्यपालांना परत बोलवण्याची विनंती केली होती. किरण बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप व्ही. नारायणसामी यांनी केला होता.