Bhagwant Mann : एक नंबर मुख्यमंत्री ! पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा आरोग्य मंत्र्यांना झटका, भ्रष्टाचाराच्या तक्रारींनंतर हकालपट्टी

विजय सिंगला यांच्या विरोधात ठोस पुरावे सापडल्याने त्यांच्यावरती कारवाई करण्यात आल्याची माहीती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Bhagwant Mann : एक नंबर मुख्यमंत्री ! पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा आरोग्य मंत्र्यांना झटका, भ्रष्टाचाराच्या तक्रारींनंतर हकालपट्टी
एक नंबर मुख्यमंत्री !Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 2:13 PM

नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी आरोग्य मंत्र्यांची भ्रष्टाचाराच्या तक्रारींनंतर हकालपट्टी केली आहे. कंत्राटासाठी आरोग्यमंत्री (Health Minister) विजय सिंगला (Vijay Singla) यांनी एक टक्क्यांची मागणी केली होती. विजय सिंगला यांच्या विरोधात ठोस पुरावे सापडल्याने त्यांच्यावरती कारवाई करण्यात आल्याची माहीती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

एक टक्का कमिशन मागितल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या सरकारचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना हटवले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, विजय सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यासंदर्भात पुरावेही सापडले आहेत. तसेच “करारांच्या बदल्यात अधिकाऱ्यांकडून एक टक्का कमिशन मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे. विजय सिंगला यांच्याविरोधात ठोस पुरावेही सापडले आहेत.

एक टक्काही भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही

विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याची घोषणा करताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक टक्काही भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच ते म्हणाले की, लोकांनी मोठ्या अपेक्षेने आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन केले आहे. त्या अपेक्षेप्रमाणे जगणे हे आपले कर्तव्य आहे. जोपर्यंत अरविंद केजरीवाल सारखे भारतमातेचे सुपुत्र आणि भगवंत मान सारखे सैनिक आहेत, तोपर्यंत भ्रष्टाचाराविरुद्धचे महायुद्ध सुरूच राहील, असंही त्यानी स्पष्ट केले आहे.

नेत्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठीही कडक संदेश

अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराची व्यवस्था उखडून टाकण्याची शपथ घेतली आहे. आम्ही सर्व त्यांचे सैनिक आहोत, असे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इथे एक टक्काही भ्रष्टाचाराला थारा नाही. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्याच मंत्र्याला बडतर्फ करण्याची ही कारवाई भ्रष्टाचारात गुंतलेल्या इतर नेत्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठीही कडक संदेश म्हणून पाहिली जात आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्र्याला बडतर्फ करण्याची पंजाबमधील ही पहिलीच वेळ आहे.

विशेष म्हणजे पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाने भ्रष्टाचारावरून सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्याचे आश्वासन पक्षाने दिले होते.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.