तुरुंगाच्या जमिनीवर पेट्रोल पंप उभे राहणार, 400 कैद्यांना मिळणार काम, ‘या’ राज्यानं घेतला निर्णय

पंजाब राज्य सरकारनं इंडियन ऑईलच्या सहकार्यानं एक मोठा निर्णय घेतला आहे. Punjab Government Indian Oil

तुरुंगाच्या जमिनीवर पेट्रोल पंप उभे राहणार, 400 कैद्यांना मिळणार काम, 'या' राज्यानं घेतला निर्णय
इंडियन ऑईल
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 2:22 PM

चंदीगड: पंजाब राज्य सरकारनं इंडियन ऑईलच्या सहकार्यानं एक मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारनं पंजाब तुरुंग विकास बोर्डाच्या जमिनींवर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे आऊटलेट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब तुरुंग विकास बोर्डावरील सदस्यांची नव्यानं नियुक्ती करण्यात आली होती. पंजाब सरकार आणि इंडियन आईल राज्यभरातील 12 ठिकाणी पेट्रोल पंप उभारेल. विशेष म्हणजे ज्या कैद्यांची वर्तणूक चागंली असेल अशा 400 जणांना त्या पंपावर काम मिळणार आहे. (Punjab government approves proposal to start Indian Oil Corp Petrol Pumps on jail land)

12 पेट्रोल पंप सुरु होणार

पंजाबमधील तुरुंग विकास बोर्डाकडे असणाऱ्या 12 जमिनींवर पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहेत. इंडियन ऑईल पेट्रोल पंपाची उभारणी करणार आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या 400 कैद्यांना पेट्रोल पंपावर काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामध्ये महिला कैद्यांना प्राधान्य दिलं जाईल. पंजाब सरकारला यामाध्यमातून दरमहिन्याला 40 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे.

उजाला पंजाब ब्रँडला मंजुरी

पंजाब सरकारनं जाहीर केलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंजाबच्या तुरुंगातील कैद्यांनी बनवलेल्या उत्पादनांना उजाला पंजाब हे नाव ब्रँड म्हणून वापरण्यास मंजुरी दिली आहे. पंजाब सरकारनं तुरुंग प्रशासनाच्या जागेमध्ये सुरु असणाऱ्या कारखान्यांना पंजाब तुरुंग विकास बोर्डाच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

साबण आणि सॅनिटायझरची निर्मिती

पंजाब तुरुंग विकास बोर्डाचे सचिव प्रविण सिन्हा यांनी तुरुंगात सुरु असलेल्या कारखान्यांमधून सध्या चादर, टॉवेल, फर्निचर, स्टेशनरी , साबण आणि सॅनिटायझर तयार केला जात असल्याची माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price Today : इंधनाचे नवे दर जारी, वाचा तुमच्या शहरातले ताजे भाव

Gold price: गुढीपाडव्याला सोनं महागण्यापूर्वी खरेदी करायचेय, जाणून घ्या सोने -चांदीचा आजचा दर किती?

(Punjab government approves proposal to start Indian Oil Corp Petrol Pumps on jail land)

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.