पोलिसांसमोरच शिवसेनेच्या नेत्यावर गोळ्या झाडल्या, सगळी घटना सीसीटीव्हीत कैद्य…

शिवसेना नेते सुधीर सुरी हे अमृतसरमधील मंदिराबाहेर आंदोलन करत होते, त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

पोलिसांसमोरच शिवसेनेच्या नेत्यावर गोळ्या झाडल्या, सगळी घटना सीसीटीव्हीत कैद्य...
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 7:58 PM

नवी दिल्लीः पंजाबमधील अमृतसरमध्ये शिवसेनेचे नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अमृतसरमधील एका मंदिराबाहेर ही घटना घडली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नेते मंदिराबाहेर ठिय्या आंदोलनासाठी बसले होते. यावेळी जमलेल्या जमावातीलच एकाने कोणीतरी सुरी यांच्यावर गोळ्या झाडल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबार झाला त्यावेळी त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्याचेही सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी सुरी यांचा मृतदेह ताब्यात देऊन पुढील तपास सुरू केला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

शिवसेना नेते सुधीर सुरी हे अमृतसरमधील मंदिराबाहेर आंदोलन करत होते. त्यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

यावेळी जमलेल्या जमावामधून कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने तिथे प्रचंड गोंधळ उडाला होता.

सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर परिसरात नाकाबंदी केली गेली असून त्यांच्या या हत्येमुळे पंजाबमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुधीर सुरी हे शिवसेना पक्षातील आणि पंजाबमधील एक चर्चेतील नाव होते.

यापूर्वी गुरुवारीही शिवसेनेच्या एका नेत्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. टिब्बा रोडवरील ग्रेवाल कॉलनीतील पंजाबचे शिवसेनेचे नेते अश्विनी चोप्रा यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता.

पोलिस तपासात मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे समोर आले आहे.

बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.