Rahul Gandhi : ‘होय, आणीबाणी चुकच होती!’, काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून पहिल्यांदाच जगजाहीर कबुली

इंजिरा गांधी यांचे नातू, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी आणीबाणीच्या निर्णयाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Rahul Gandhi : 'होय, आणीबाणी चुकच होती!', काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून पहिल्यांदाच जगजाहीर कबुली
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 12:33 AM

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळत घेण्यात आलेल्या आणीबाणीच्या निर्णयावरुन आतापर्यंत अनेकदा काँग्रेसवर सडकून टीका होत आली आहे. आता इंजिरा गांधी यांचे नातू, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी आणीबाणीच्या निर्णयाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आणीबाणी ही तत्कालीन काँग्रेस सरकारची चूकच होती, अशी जाहीर कबुलीच राहुल गांधी यांनी दिली आहे.(Rahul Gandhi admits that Indira Gandhi’s emergency decision was wrong)

‘काँग्रेसनं त्या चुकीचा फायदा घेतला नाही’

कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना राहुल यांनी आणीबाणीबाबत मोठं वक्तव्य केलंय. प्राध्यापक कौशिक बसू यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ‘आणीबाणी घोषित करणं ही इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, काँग्रेसनं पक्ष म्हणून त्याचा कधीही फायदा करुन घेतला नाही. तेव्हा जे झालं आणि आज जे होत आहे, त्यात मोठा फरक आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.

भाजपवर शरसंधान

‘संसदेत आम्हाला बोलण्यास परवानगी नाही, न्यायव्यवस्थेकडून आशा नाही, RSS आणि भाजपकडे मोठी आर्थिक ताकद आहे. व्यावसायिकांना विरोधी पक्षांसोबत उभं राहण्यास परवानगी नाही. लोकशाहीवर हा विचारपूर्वक केलेला हल्ला आहे. मणिपूरमध्ये राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुद्दुचेरीत उपराज्यपालांनी अनेक बिल पास होऊ दिले नाहीत. कारण, त्या RSSशी जोडल्या गेलेल्या होत्या. काँग्रेसनं कधीच संस्थानांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. सध्याचं सरकार लोकशाही व्यवस्थेला नुकसान पोहचवत आहे’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.

‘सध्या भारतात स्वातंत्र्यावरच घाला’

‘काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाहीला चालना देण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. यावरुन माझ्याच पक्षातील लोकांनी माझ्यावर टीकाही केली होती. पण पक्षांतर्गत लोकशाही असणं अत्यंत गरजेचं असल्याची मी पक्षातील नेत्यांना सांगितलं. आधुनिक लोकशाही व्यवस्था त्यामुळेच प्रभावी आहेत. कारण, त्यांच्याकडे स्वतंत्र संस्था आहेत. पण भारतात त्याच स्वातंत्र्यावर हल्ला केला जात आहे’, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

Video: सभेला उशीर झाला तर तुम्ही काय कराल? प्रियंका गांधींनी काय केलं ते बघा!

PHOTOS : पुशअप्स, समुद्रात स्विमिंग आणि अ‍ॅब्स… ‘या’ कारणांमुळे सर्वत्र राहुल गांधींच्या फिटनेसची चर्चा

Rahul Gandhi admits that Indira Gandhi’s emergency decision was wrong

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.