Rahul Gandhi : राहुल गांधींना ईडी समोर हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स, 10 जूनला परदेशातून भारतात परतण्याची शक्यता
Rahul Gandhi : राहुल गांधींना ईडी समोर हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स, 10 जूनला परदेशातून भारतात परतण्याची शक्यता
नवी दिल्ली : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणात गुरुवार ऐवजी आता ईडीने (Enforcement Directorate) 13 जूनला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. राहूल गांधी सध्या परदेशात आहेत. 10 जूनला राहुल गांधी भारतात परतण्याची शक्यता आहे. 13 किंवा 14 जुनला राहुल गांधी हजर होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. राहूल गांधी सध्या परदेशात असल्याने त्यांनी ईडीला पत्र लिहून चौकशीसाठी पुढची तारीख मागितली होती. राहूल गांधी परदेशात असल्यामुळे पहिल्या सुनावणीच्या ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी ईडीला पत्र लिहूनं दुसरी तारीख मागितली होती. आज ती तारिख ईडीकडून जाहीर करण्यात आली.
13 जूनला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने नोटीस बजावली होती. तसेच आठ जूनला कार्यालयात चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईडीने नोटीस बजावल्यानंतर कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप सुडबुद्धीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता.तसेच ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही तिथं सुद्धा अशाचं पद्धतीने ईडीच्या कारवाया सुरू असल्याचे ओरड देशात नेते करीत आहेत. आता राहूल गांधी भारतात परतल्यानंतर ईडी चौकशी करणार आहे. 13 जूनला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी सांगितले असल्याने राहूल गांधी 10 जूनला भारतात परततील अशी शक्यता आहे.
सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग
कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी हे म्हणाले आहे की, सोनिया गांधी दिलेल्या वेळेचं पालन करतील. काल सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्या ईडीकार्यालयात कधी हजर राहणार याबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली आहे.
केंद्राने पैशाची सत्ता काबीज केली
गांधी परिवाराला हात लावण्याचा प्रयत्न केला, तर देशातील सामान्य माणूस पेटून उठेल. केंद्रातील सरकार घाबरलेलं आहे. केंद्रातील सरकार फेलीवर आहे. आठ वर्षापासून जनतेशी खोटं बोलून केंद्राने पैशाची सत्ता काबीज केली आहे. खोटी भूमिका घेऊन खोटे आश्वासन देऊन केंद्रातले सरकार सत्तेतं आले आहे. गांधी परिवाराला बदनाम करण्याचा हा त्यांचा अयशस्वी प्रयत्न आहे, तसेच यांनी देश बरबाद केला आहे. गांधी परिवार आणि नेहरू परिवार भाजपने नेहमी टार्गेट राहिला केला आहे. 2015 ची घटना आहे त्याचा निकाल लागला आहे तो प्रश्न संपलेला आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.