भाजपने ज्या मुद्यावरुन घेरले, तोच मुद्दा राहुल गांधींनी झिडकारला….
भारत जोडी यात्रा महत्वाची असली तरी राहुल गांधी अध्यक्षपदी असताना जे करु शकले नाहीत, ते त्यांनी पदाशिवाय करुन दाखवले आहे.
नवी दिल्लीः काँग्रेस पक्षासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) काढली असली तरी, मागील काळात भाजपकडून राहुल गांधी यांच्याइतकी कुणाचीही खिल्ली उडवली गेली नसेल. त्यामुळे आता भारत जोडो यात्रेचे 30 दिवस पूर्ण झाले असून त्यांच्यासोबत आता या तिसव्या दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही (Congress President Sonia Gandhi) कर्नाटकातील भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत. दसऱ्यादिवशी त्यांनी भीमनकोल्ली मंदिरात दर्शन घेतले होते.
काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांचा हा शेवटचा मोठा कार्यक्रम असला तरी या यात्रेच्या त्या खऱ्या नायक नाहीत खरा चेहरा हा राहुल गांधी (Rahul Gandhi) आहे, मात्र एक चित्र पूर्ण करण्यासाठी सोनिया गांधींचा हातही त्यासाठी महत्वाचा मानला जातो आहे.
भारत जोडो यात्रेचे हे 30 दिवस महत्वाच्या टप्प्यावर असणार आहेत. ज्याप्रमाणे 2004 मध्येही ज्या प्रमाणे सोनिया गांधींनी राजकीय परिस्थिती बदलून टाकली त्याच प्रमाणे आताही ती शक्यता नाकारता येत नाही असंही काही तज्ज्ञ मानत आहेत.
2004 मध्ये सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पद नाकारले होते, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग देशाली पंतप्रधान म्हणून मिळाले होते. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले होते की, मी जर पंतप्रधान झाले असते तर देशाची फाळणी झाली असती, त्यामुळे मी हे पद नाकारल्याची त्यांनी सांगितले होते.
त्यानंतर त्यांना त्यागाच्या मूर्तीची उपमाही देण्यात आली होती. सोनिया गांधी यांनी कोणतेही सरकारी पद न ठेवता मनमोहन सिंग यांच्यासोबत 10 वर्षे सरकार चालवले होते.
राहुल गांधी 2013 मध्ये पक्षाचे उपाध्यक्ष झाले तर 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविले होते. मात्र या काळात त्यांना राजकीय वातावरणातील बदलाची त्यांना कल्पना आली नाही.
ती परिस्थिती समजून घेईपर्यंत काँग्रेसचे प्रचंड नुकसान झाले होते. 2019 च्या पराभवानंतर मात्र त्यांना गांधी घराणे हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी असणे राजकीय फायद्यासाठी योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या देशातील राहुल गांधी ही एकमेव अशी व्यक्ती आहे की, त्यांच्या इतकी खिल्ली इतर कोणत्याही नेत्याची उडवली गेली नव्हती.
शासन क्षमता, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा कोणत्याही राजकारण्यासाठी आवश्यक मानला जातो, परंतु भाजपने राहुल गांधींच्या बाबतीत मात्र तो साफ खोटा ठरवला.
1980 नंतर पहिल्यांदाच गांधी घराण्यातील व्यक्ती सक्रिय राजकारणात असूनही अध्यक्षपदी विराजमान झाली नाही. याचे कारण म्हणजे घराणेशाही. तोच मुद्दा नरेंद्र मोदींनी उचलून धरला आणि त्याचे राजकारण केले.
भारत जोडी यात्रा महत्वाची असली तरी राहुल गांधी अध्यक्षपदी असताना जे करु शकले नाहीत, ते त्यांनी पदाशिवाय करुन दाखवले आहे.
सध्या काँग्रेसचे ते एकमेव राष्ट्रीय नेते आहेत. ज्यांनी कोणत्याही पदावर नसताना भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक सलोखा वाढवला आहे. त्यामुळे सत्ता, पदापासून लांब राहूनही त्यांचा त्यांच्या पक्षाला फायदा मिळत आहे.
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांच्याकडे एका नव्या दृष्टीकोनातून लोक त्यांच्याकडे पाहत आहेत. राहुल गांधी ना मंत्री आहेत, ना ते त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र भारत जोडो यात्रा मात्र त्यांना नव्या रुपात लोकांसमोर घेऊन आली आहे.
गेल्या 30 दिवसांचे मूल्यमापन केले गेलेच तर तर आरएसएस आणि राजस्थानातील तमाशावरील छोटे-छोटे ट्विट सोडले तर काँग्रेसला कोणत्याही गोष्टीबाबत वाईट प्रसिद्धी मिळाली नाही.
ती सगळी जमेची बाजू ही राहुल गांधींची आहे. पावसात भिजल्याचे चित्र असो किंवा मुलांसोबत फिरतानाचे राहुल गांधी यांचे फोटो असोत, काँग्रेस मात्र कार्यकर्त्यांची फौज उभा करण्यात यशस्वी होताना दिसून येत आहे.