Rahul Gandhi : 78 वर्षीय महिलेकडून आपली सर्व संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर!
देहरादूनमधील रहिवासी पुष्पा मुंजियाल यांनी राहुल गांधींना आपल्या सर्व संपत्तीचं मालक बनवलं. त्यांनी देहरादून कोर्टात राहुल गांधी यांना मालकी हक्काचं मृत्यूपत्र सादर केलंय.
नवी दिल्ली : उत्तराखंडमधील (Uttarakhand) एका महिलेनं आपली सगळी संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नावावर केलीय! देहरादूनमधील एका 78 वर्षीय महिलेनं आपली 50 लाखाची मालमत्ता आणि 10 तोळे सोनं अशी सर्व संपत्ती राहुल गांधी यांना दिलीय. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसला मानहाणीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काँग्रेसमधील मतभेद आणि गांधी परिवाराचा विरोध पुन्हा एकदा समोर आला. अशावेळी राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचं या महिलेनं म्हटलंय. देहरादूनमधील रहिवासी पुष्पा मुंजियाल यांनी राहुल गांधींना आपल्या सर्व संपत्तीचं मालक बनवलं. त्यांनी देहरादून कोर्टात राहुल गांधी यांना मालकी हक्काचं मृत्यूपत्र सादर केलंय.
आपल्यावर राहुल गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. म्हणून आपली संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर करत आहे. असं या महिलेनं सांगितलं. या महिलेकडे 50 लाखाची जंगम आणि स्थावर मालमत्ता, तसंच 10 तोळे सोनं आहे. याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष लालचंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेनं राहुल गांधी यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांच्याकडे दिलं. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत राहुल गांधी यांच्या कुटुंबानं देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलंय. मग ते इंदिरा गांधी असोत किंवा राजीव गांधी. देशाची एकता आणि अखंडतेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, असं त्या महिलेनं सांगितल्याचं लालचंद शर्मा म्हणाले.
वृद्ध महिलेकडून सर्व संपत्ती राहुल गांधींच्या नावावर
Pushpa Munjiyal a 78 yrs old woman from Dehradun has donated all her wealth to Rahul Gandhi ❤️
She said India needs Rahul Gandhi !! God bless her ❣️ pic.twitter.com/Dpe5jPzp9i
— Surbhi✨ (@SurrbhiM) April 4, 2022
राहुल गांधींचा मोदी सरकारव हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. त्यात 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यापासून इंधनाच्या किंमतीमध्ये कशाप्रकारे वाढ झाली हे नमूद करण्यात आलंय. या फोटोमध्ये राहुल गांधी यांनी 2014 मधील तेलाच्या किमती आणि आताच्या तेलाच्या किमती देत तुलना केलीय. 2014 मध्ये एक दुचाकीची टाकी फुल करण्यासाठी 714 रुपये लागत होते. मात्र, आता 1 हजार 14 रुपये लागतात, असं सांगितलं आहे.
इंधन दरवाढीवरुन केंद्रावर निशाणा
Pradhan Mantri Jan Dhan LOOT Yojana pic.twitter.com/OQPiV4wXTq
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 4, 2022
इतर बातम्या :