भाजपनं खोटेपणाचाही संस्थात्मक प्रचार केला, यामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागेल : राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे (Rahul Gandhi on Corona GDP China issue).
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे (Rahul Gandhi on Corona GDP China issue). भाजपनं खोटेपणाचाही संस्थात्मक पातळीवर प्रसार केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. तसेच भाजपचा हा भ्रम लवकरच तुटेल आणि त्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल, असं ते म्हणाले. राहुल गांधी यांनी याविषयी एक ट्विट करत भाजपवर टीका केली. यात त्यांनी भाजपवर तीन प्रमुख आरोप केले. यात कोविड, जीडीपी आणि चीनच्या मुद्द्यावर मोदी सरकार खोटं बोलल्याचा आरोप केला.
राहुल गांधी म्हणाले, “भाजप खोटेपणाचाही संस्थात्मक पातळीवर प्रसार करत आहे. भाजपने कोरोना चाचणी (Covid19 Test) करण्यावर निर्बंध लावले आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी चुकीची सांगितली. जीडीपी (GDP) मोजण्यासाठी नव्या पद्धतीचा उपयोग करण्यात आला. चिनी आक्रमणावर पांघरुन घालण्यासाठी माध्यमांना भीती दाखवण्यात आली. भाजपचा हा भ्रम लवकरच तुटेल आणि देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
भाजपा झूठ को संस्थागत तौर पर फैला रही है।
1. Covid19 टेस्ट पर बाधाएँ लगायीं और मृतकों की संख्या ग़लत बतायी। 2. GDP के लिए एक नई गणना पद्धति लागू की। 3. चीनी आक्रमण पर पर्दा डालने के लिए मीडिया को डराया।
ये भ्रम जल्द ही टूट जाएगा और देश को इसकी भारी क़ीमत चुकानी होगी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 19, 2020
आपल्या ट्विटमधून राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर कोरोना, जीडीपी आणि चीन या मुद्द्यांवर सत्य लपवल्याचा आणि खोट्या गोष्टींचा प्रसार केल्याचा आरोप केला. तसेच हे जास्त काळ चालणार नसून लवकरच हा भ्रम तुटेल आणि याची देशाला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही दिला.
China has taken our land and GOI is behaving like Chamberlain. This will further embolden China.
India is going to pay a huge price because of GOI’s cowardly actions. pic.twitter.com/5ewIFvj5wy
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 18, 2020
दरम्यान, राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत चीन प्रकरणात मोदी सरकारच्या भ्याडपणाची भारताला मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा आरोप केला. तसेच चीनने भारताचा भूभाग घेतला असूनही मोदी सरकार भ्याडपणे वर्तन करत आहे, असा आरोप केला.
हेही वाचा :
Corona Community Spread | भारतात बिकट स्थिती, कोरोनाचा समूह संसर्ग सुरु, IMA चा दावा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव, तिघांना संसर्ग, एकाचा मृत्यू
Pune Lockdown: पुण्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता, दुकानं सुरु ठेवण्याच्या वेळेत बदल
Rahul Gandhi on Corona GDP China issue